तेरावर्षीय मुलाची आत्महत्त्या
By Admin | Updated: July 21, 2016 23:03 IST2016-07-21T23:02:58+5:302016-07-21T23:03:13+5:30
तेरावर्षीय मुलाची आत्महत्त्या

तेरावर्षीय मुलाची आत्महत्त्या
नाशिक : जुने सिडको शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका तेरावर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजीनगर येथे चंद्रमणी दिलीप अंबोरे (१३) हा शाळकरी मुलगा कुटुंबासमवेत राहतो. अंबोरे याने गळफास घेत आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत अंबड पोलीस तपास करत आहेत. शहरात दोन दिवसांमध्ये लागोपाठ ही दुसरी घटना आहे. किशोरवयीन मुलीने दोन दिवसांपूर्वी पंचवटी भागात आत्महत्त्या केली होती. (प्रतिनिधी)