शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

13 हजार परप्रांतिय मजुरांची एसटीने रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 16:49 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याच बरोबर जे नागरिक जेथे आहेत तेथेच त्यांनी राहावे असे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देआठ दिवसात ५८८ बसेस

नाशिक : देश व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच जागोजागी अडकून पडलेल्या व नाशकात आश्रय घेतलेल्या सुमारे तेरा हजार परप्रांतिय मजुरांना एसटी बसने त्यांच्या राज्याच्या सिमेवर पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याच बरोबर जे नागरिक जेथे आहेत तेथेच त्यांनी राहावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार साधारण सुरूवातीचे पंधरा दिवस नागरिकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आहे तेथेच आसरा घेतला. त्यानंतर मात्र त्यांचा धीर सुटू लागल्याने त्यांनी घराचा रस्ता धरला. या काळात सर्व प्रकारचे वाहने बंद असल्याने मजुरांनी व विशेषत: परप्रांतिय नागरिकांनी पायीच मार्गक्रमण सुरू केले. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्ह्याच्या सिमेवर या मजुरांची अडवणूक करण्यात येवून त्यांची रवानगी ठिकठिकाणच्या निवाराशेडमध्ये करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारे सुुमारे तेरा हजाराहून अधिक परप्रांतिय मजुरांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले असता, आता मात्र त्यांची टप्पाटप्याने रवानगी सुरू करण्यात आली आहे. महाराष्टÑ शासनाने अशा परप्रांतिय मजुरांची यादी करून त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने गेल्या आठ दिवसात ५८८ बसेसच्या माध्यमातून १२,८७५ मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले. सर्वाधिक मजुर मध्यप्रदेशच्या गोंदिया सिमेवर सोडण्यात आले असून, त्यानंतर राजस्थान, बिहार, केरळ, गुजरात, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्याच्या सिमेवर पाठविण्यात आले. काही मजुरांसाठी खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयstate transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस