तिसरी प्रबोधन साहित्य परिषद डिसेंबरमध्ये

By Admin | Updated: November 16, 2015 21:38 IST2015-11-16T21:37:54+5:302015-11-16T21:38:30+5:30

तिसरी प्रबोधन साहित्य परिषद डिसेंबरमध्ये

Third Wisdom Literature Council in December | तिसरी प्रबोधन साहित्य परिषद डिसेंबरमध्ये

तिसरी प्रबोधन साहित्य परिषद डिसेंबरमध्ये

नाशिक : समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने तिसरी प्रबोधन साहित्य परिषद डिसेंबर महिन्यात सटाणा येथे होणार असून, अध्यक्षस्थानी यशवंत मनोहर यांची निवड करण्यात आली आहे.
परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्रबोधन मित्र पुरस्काराचे वितरण यंदा ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी सदर पुरस्कार उत्तम कांबळे, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, ऊर्मिला पवार व शाहीर संभाजी भगत यांना प्रदान करण्यात आला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ जगताप व प्रेरणा वानखेडे यांनी कळविले आहे.

Web Title: Third Wisdom Literature Council in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.