वाडीवऱ्हे सोने लुटीतील तिसऱ्या संशयितास अटक
By Admin | Updated: May 3, 2015 01:47 IST2015-05-03T01:42:30+5:302015-05-03T01:47:26+5:30
वाडीवऱ्हे सोने लुटीतील तिसऱ्या संशयितास अटक

वाडीवऱ्हे सोने लुटीतील तिसऱ्या संशयितास अटक
वाडीवऱ्हे सोने लुटीतील तिसऱ्या संशयितास अटक नाशिक : जिल्'ातील सर्वांत मोठ्या ५८ किलो सोने लुटीच्या कटामध्ये सहभागी असलेले व वाहनाची इत्यंभूत माहिती दरोडेखोरांना देणाऱ्या दोघा संशयितांच्या अटकेपाठोपाठ पोलिसांनी शुक्रवारी (दि़१) आणखी एका संशयितास अटक केली़ तपासाच्या कारणास्तव या संशयिताचेही नाव गोपनीय ठेवण्यात आले असून, त्यास इगतपुरी न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या तिघांच्या अटकेमुळे लवकरच या सोने लुटीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे़ २४ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेजवळ पाच तोतया पोलिसांनी जिल्'ातील सर्वांत मोठा दरोडा टाकला़ ‘झी’ गोल्ड कंपनीचे ६० किलो सोने अंधेरी येथील सिक्वेल सिक्युरीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुरक्षा अधिकारी समीर मन्वर पिंजारा, वाहनचालक नावेद अहमद, सुरक्षारक्षक प्रदीप दुबे व संतोष साऊ हे शिरपूरच्या रिफायनरीमध्ये पोहोचविण्यासाठी वाहनाने (एमएच ०२ सीई ४०१०) जात होते़ मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ पांढऱ्या रंगाच्या लोगान कारमधून आलेल्या पाच तोतया पोलिसांनी हे वाहन अडविले़ या वाहनातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून ६० किलो सोन्यापैकी सोळा कोटी २३ लाख रुपयांचे ५८ किलो सोने घेऊन ते फरार झाले़