अभियांत्रिकी प्रवेशासाठी तिसरी फेरी
By Admin | Updated: July 16, 2016 01:01 IST2016-07-16T00:57:44+5:302016-07-16T01:01:33+5:30
प्रवेशप्रक्रिया : एआरसी सेंटरवर आतापर्यंत २३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

अभियांत्रिकी प्रवेशासाठी तिसरी फेरी
नाशिक : अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी शुक्रवारपासून सुरू झाली असून विभागातील विविध महाविद्यालयांत प्रवेशासाठी ११ हजार ४३४ व पदविका अभ्यासक्रमासाठी ११ हजार ६०२ अशा एकूण ३३ हजार ३६ विद्यार्थ्यांनी एआरसी केंद्रावर उपस्थित राहून फ्रीझ, फ्लोट, स्लाइड पद्धतीने फॉर्म भरले. यात जिल्ह्णातील तीन हजार २५४ विद्यार्थ्यांनी पदवीसाठी, तर पदविकेसाठी तीन हजार ९३६ अशा एकूण सात हजार १९० विद्यार्थ्यांनी पदविकेसाठी रिपोर्टिंग केले.
विभागात गेल्या वर्षी १९ हजार जागा उपलब्ध होत्या. त्यामुळे यावेळी अर्ज दाखल केलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य आहे. आॅनलाइन अर्ज दाखल झाल्यानंतर विद्यार्थी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार व गुणवत्ता यादीनुसार उपलब्ध जागांवर प्रवेशासाठी प्रक्रिया पूर्ण करीत आहे.
वेळापत्रकानुसार गुरुवारी (दि. १४) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पदवी प्रवेशासाठी नाशिक विभागातील विविध जिल्ह्णांतून सुमारे ११ हजार ४३४ विद्यार्थ्यांनी विविध एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग केले, तर अभियांत्रिकी पदविके साठी ११ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी एआरसी केंद्रावर उपस्थिती नोंदवून मूळ कागदपत्र सादर के ले. यात नाशिक जिल्ह्णातील एआरसी सेंटरवर तीन हजार २५४ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी, तर तीन हजार ९३६ विद्यार्थ्यांनी पदविकेसाठी उपस्थित राहून कागदपत्र सादर केल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागाचे संचालक डी. पी. नाठे यांनी दिली.
दरम्यान, तिसऱ्या कॅप राउंडसाठी १८ जुलैपर्यंत मुदत असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत रिपोर्टिंग प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश प्रक्रियेसाठी २० ते २९ जुलै या कालावधीत अखेरची चौथी फेरी पार पडणार असून २८ ते ६ आॅगस्ट या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांना संंबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)