..अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: September 29, 2014 22:31 IST2014-09-29T22:31:23+5:302014-09-29T22:31:37+5:30

..अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार

On the third day, the funeral on 'that' dead leopard | ..अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार

..अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील कारवाडी शिवारात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याला अखेर तिसऱ्या दिवशी अग्निडाग देण्यात आला. तथापि, सदर बिबट्याचे शरीर पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करता आले नाही त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
कारवाडी शिवारातील बाबासाहेब पुंडलीक जाधव यांच्या सोयाबीन पिकाच्या शेतात शनिवारी सायंकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आला होता. रविवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी सुटीमुळे उपलब्ध होऊ न शकल्याने शवविच्छेदनाअभावी बिबट्यावर अंत्यसंस्कार करता आले नव्हते.
सोमवारी सकाळी वावी पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. पी. डी. महाजन यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याच्या शरीराची पाहणी केली. यावेळी मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करता येणे शक्य नसल्याचा अहवाल त्यांनी दिला. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे नेमके समजू शकले नाही. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला अग्निडाग दिला.
यावेळी नाशिक पश्चिम विभागाचे सहायक उपवनसंरक्षक पी. पी. भांमरे, सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एल. बिन्नर, नांदूरशिंगोटे विभागाचे वनपाल एस. एम. गायकवाड, वनरक्षक पी. एस. सरोदे, बालम शेख, डी. एस. वाघमारे, व्ही. एम. आव्हाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: On the third day, the funeral on 'that' dead leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.