सटाण्यात तिसरे न्यायालय सुरू
By Admin | Updated: January 11, 2017 01:02 IST2017-01-11T01:02:25+5:302017-01-11T01:02:38+5:30
सटाण्यात तिसरे न्यायालय सुरू

सटाण्यात तिसरे न्यायालय सुरू
सटाणा : खटल्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सटाणा येथे तिसरे न्यायालय सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून काल सोमवार पासून तिसरे न्यायालय सुरु करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायलयाने खटल्यांचा जलदगतीने निपटारा होऊन न्यायदानाचे काम सोपे व्हावे म्हणून तिसरे न्यायालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिसर्या न्यायालयाची वकील संघाने मागणी केले होती.त्याची दखल घेऊनच मागणी मान्य करत या तिसर्या न्यायालयाकडे फौजदारी व दिवाणी असे प्रत्येकी पाचशे प्रकरणे देण्यात आली आहेत.या तिसर्या न्यायालयाच्या कामकाजाचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश एस.एम.गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी न्यायाधीश पी.जी. तापिडया ,नविनयुक्त न्यायाधीश व्ही.ए.आव्हाड ,वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे हे प्रमुख पाहणे होते.कार्यक्र मास सतीश चिंधडे ,नितीन चंद्रात्रे ,नाना भामरे ,सी.एन.पवार ,अभिमन्यू पाटील ,रवींद्र पाटील,सरोज चंद्रात्रे उपस्थित होते. (वार्ताहर)