शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सासूच्या पाया पडण्यासाठी पर्स बाजूला ठेवली अन् चोरटयाने लांबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 14:12 IST

पंचवटी - औरंगाबादहून लग्न सोहळ्यासाठी नाशिकला आलेली महिला लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर समोरून आलेल्या मावस सासूच्या पाया पडण्यासाठी बाजूच्या खुर्चीवर ...

पंचवटी - औरंगाबादहून लग्न सोहळ्यासाठी नाशिकला आलेली महिला लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर समोरून आलेल्या मावस सासूच्या पाया पडण्यासाठी बाजूच्या खुर्चीवर ठेवलेली पर्स अवघ्या काही सेकंदात चोरट्याने लांबविली आणि महिलेचा जवळपास चार लाखांचा ऐवज चोरीस गेला.

घटना औरंगाबाद महामार्गावरील एका लग्न सोहळ्यातील आहे. औरंगाबाद येथून लग्न सोहळ्यासाठी आलेल्या महिलेची चार लाख रुपये किमतीचेे दहा तोळे असलेली सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग चेारट्याने भरदिवसा मंगल कार्यालयातून लांबविल्याची घटना काल बुधवारी चार वाजता घडली आहे. या चोरीप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील इटखेडा पैठण रोड येथे राहणाऱ्या मनीषा उमेश सोनवणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनवणे या दुपारी चार वाजेच्या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या एका मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याला आल्या होत्या. त्याचवेळी कार्यालयात त्यांच्या नातेवाईक असलेल्या मावस सासूच्या पाया पडण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळील दागिन्यांची बॅग खुर्चीवर ठेवत पाया पडत असताना चोरट्याने खुर्चीवर ठेवलेली दागिन्यांची बॅग लांबविली.

या बॅगेत तीन पदरी सोन्याचा हार, सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, सोन्याचा वेढा, विवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच २० हजार रुपये रोख असा चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

 

टॅग्स :theftचोरीNashikनाशिक