शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी लाखोंची कॅश असलेले एटीएम पळविले, नाशिक पोलिसांनी पाठलाग करताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 11:49 IST

लासलगाव येथील विंचूर रोडवर ॲक्सिस बँकेची शाखा आहे. या शाखेजवळ ए टी एम  मशीनची तपासणी पहाटे तीन वाजता पोलिसांनी केली होती.

- शेखर देसाईलासलगाव : विंचूर रोडवरील ॲक्सिस बँकेच्या जवळील चौदा लाख एकोंनंवद हजारांची कॅश असलेले एटीएम पहाटे चार वाजेच्या सुमारास पळविले. परंतू, याची खबर पोलिसांना लागताच त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. हे पाहून चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती अर्टिगातून हे एटीएम रस्त्यावरच फेकून देत पळ काढल्याची घटना घडली आहे. 

लासलगाव येथील विंचूर रोडवर ॲक्सिस बँकेची शाखा आहे. या शाखेजवळ ए टी एम  मशीनची तपासणी पहाटे तीन वाजता एस आय. नंदकुमार देवढे, देवा पानसरे आणि होमगार्ड डी के.पगारे यांनी केली आणि ते लासलगाव येथे  गस्तीला गेले. यानंतर पावणे चार वाजेचे सुमारास या  एटीएममध्ये चार आज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. या मशीनला फाउंडेशन नसल्याने अवघ्या पंधरा मिनिटात मशीन हलवले आणि सोबत आणलेल्या चार चाकी वाहनात टाकून ते निघाले. 

एटीएम सुरक्षा यंत्रणेकडून सदरच्या घटनेची माहिती लासलगाव शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना मिळाली आणि त्यांनी पोलीस पथकाला पाठविले. पथकाने सीसीटीव्ही पाहून या कारचा पाठलाग सुरु केला. विंचूरकडे चोरटे गेल्याचे लक्षात येताच पोलिसही तिकडे निघाले. तिथला सीसीटीव्ही पाहिला असता ते निफाडकडे गेल्याचे समजले. तिकडे चोरट्यांची गाडी पोलिसांनी गाठली, परंतू पोलीसांना पाहून चोरट्यांनी कारला जोरात ब्रेक मारला व मागच्या डिक्कीत ठेवलेले एटीएम मशीन रस्त्यावर फेकले. 

पोलिसांनी या चोरट्यांचा पुढे पाठलाग केला, परंतू ते मिळू शकले नाहीत. पोलिसांनी तातडीने मशीनची तपासणी करून लासलगावचे स पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी संपर्क करून तातडीने नाकाबंदी केली यानंतर मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती नाशिकचे पोलीस उपाधीक्षक सुरेश भामरे तातडीने लासलगाव दाखल झाले. लासलगाव ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक  दिलीप शिंदे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

टॅग्स :atmएटीएमPoliceपोलिस