शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात चोरट्यांचा सुळसुळाट ; पंचवटीत घरफोडी, इंदिरानगरमध्ये पैशांची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:56 IST

पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या  घरफोडीची घटना समोर आली असन  इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देपंचवटीत 95 हजार रुपयांंची घरफोडीइंदिरानगरमध्ये गाडीच्या काचा फोडून रोकड लंपासनिवासी इमारतीच्या वाहनतळात फोडली गाडीची काच

नाशिक : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून दिवसेंदिवस घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या  घरफोडीची घटना समोर आली असन  इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे. पंचवटीतील पेठरोड दत्तनगर परिसरात एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे ९५  हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणात सुदाम काशिनाथ थिटे (६९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम थिटे बुधवार (दि.२२) व गुरुवार (दि.२२) या दोन दिवसाच्या कालावधीत कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टीव्ही, गॅस सिलेंडर तसेच सोन्या चांदीचे दागिने आणि रोख ३० हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. थिटे घरी आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले त्यांनी घरात प्रवेश केला लोखंडी कपाट उघडे दिसले व त्यातील सोन्याचांदीचे दागिने, असता किचनच्या लाफ्टवरी कडीच्या डब्यात ठेवलेले रोख रक्कम, किचनमधील गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे दिसले त्यावरून घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.  

गाडीची काच फोडून रोकड लंपास इंदिरानगरच्या  राजीवनगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळात उभ्या असलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून पुढील सीटवर ठेवलेल्या  बॅग मधून सुमारे ८६ हजार चारशे रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले. राजीवनगरच्या प्रथमेश अपार्टमेटमधील बिनय थॉमस (४७)गुरुवारी (दि२३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी क्रमांक एमएच १५ सिटी ४२३२ गाडीची चालकाच्या शेजारील दरवाजाची काच फोडून पुढच्या सीटवर  ठेवललेली बॅग  चोरट्यांनी चोरून नेली. त्यात ८६ हजार चारशे  रुपये रोख व दुकानाचे हिशोबाचे कागदपत्रे असा मुद्देमाल दोघ्या चोरट्यांनी चोरून दुचाकीने धूम स्टाइल पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसcarकारRobberyचोरी