शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वावी येथून चोरट्यांनी लांबवली २१ हजार अंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:06 IST

सिन्नर तालुक्याच्या दुशिंगपूर (वावी) येथील  पोल्ट्री शेडची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी कोंबड्यांच्या अंड्यांनी भरलेले ७०० ट्रे चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास घडली. यात २१ हजार अंड्यांची चोरी झाली असून, शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सिन्नर : तालुक्याच्या दुशिंगपूर (वावी) येथील  पोल्ट्री शेडची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी कोंबड्यांच्या अंड्यांनी भरलेले ७०० ट्रे चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास घडली. यात २१ हजार अंड्यांची चोरी झाली असून, शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून वावी परिसरातील पोल्ट्री शेडमधून अंडी चोरी करण्यास प्रारंभ केल्याने शेतकरी धास्तावले आहेत.वावी येथील व्यावसायिक राजेंद्र लक्ष्मीनारायण भुतडा यांचे  दुशिंगपूर शिवारात पोल्ट्रीचे तीन शेड आहेत. त्यापैकी एका पोल्ट्रीच्या गोडाउनची लोखंडी जाळी चोरट्यांनी कापली. या शेडमध्ये अंडी भरलेले ७०० ट्रे चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या वाहनात भरून नेले. रात्री १२ वाजेपर्यंत पोल्ट्री शेडवरील कामगार पोल्ट्रीत होते. रात्री ते झोपण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी शेडवर येऊन अंड्यांचे ट्रे चोरून नेले. पोल्ट्री शेडचा सुपरवायझर सकाळी उठल्यानंतर त्याच्या दरवाजाची कडी बाहेरून लावलेली होती. त्याने फोन करून कामगारांना दाराची कडी उघडण्यास लावली. त्यानंतर सुपरवायझर आणि कामगार अंड्यांच्या गोडाउनकडे गेल्यानंतर त्यांना जाळी कापलेली आणि शेडमधील अंड्यांचे ट्रे नसल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांचा ‘अंडे का फंडा’भुतडा यांचे तीन मोठे पोल्ट्री शेड असून, एका शेडमध्ये साडेआठ हजार, तर उर्वरित दोन शेडमध्ये साडेसात व पाच हजार कोंबड्या आहेत. त्यामुळे दररोज हजारो अंडी मिळतात. सदर अंडी ट्रेमध्ये भरल्यानंतर ते व्यापाऱ्यांच्या गाड्या आल्यानंतर पुणे, निफाड, विंचूर  व कोपरगाव या परिसरात पाठवले जातात. मात्र चोरट्यांनी या २१ हजार अंड्यांवर डल्ला मारल्याने भुतडा यांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात घोटेवाडी रस्त्याला नवनाथ यादव यांच्या पोल्ट्री शेडमधूनही अज्ञात चोरट्यांनी अंड्यांचे ट्रे चोरून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांचा हा अंडे का फंडा मात्र पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंता वाढवत आहे.  

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी