नामपूर - परिसरात दरोडेखोरांनी उच्छाद मांडलेला असून मागील अठवड्यातील दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पकडलेले संशयित कोपरगाव तालुक्यातील पाथर्डी येथील असून त्याबाबतही पोलीस ठोस निर्णयाप्रत आलेले नाहीत. गुन्हेगारांनाही शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. नागरिक मात्र अद्यापही असग्रस्त आहेत.१९८७ सालात आसखेडा येथे बिरारींचा खून झाला. २००७ सालात काकड गावच्या सौ. निर्मला पवार या गृहीणीचा खुन झाला. दोन वर्षापुर्वी श्रीपुरवडे येथील धनगर समाजाच्या नवयुवकाचा खुन झाला. अद्यापही गुन्हेगारांचा शोध नाही. गेल्या अठवड्यात कारभारी देवबा देवरे व सुनीता देवरे यांना मारहान करुन रोकड व सोने नेले पोलिस तपासच करीत आहेत. यामुळे ग्रामस्थ भयग्रस्त आहेत. अमातुषपणे मारहान करतात. कारभारी देवरेंना जी मारहान झाली. ते अजूनही अस्वस्थ आहेत. शिवाय त्यांना पॅरालिसिसचा ॲटॅक येऊन गेल्याने शस्त्रक्रियाही करता येत नाही. मुलाचे लग्न होते ते पुढे ढकलले आहे. पोलिसांना मात्र या घटनेत ना खेद ना खंतनामपूरला संजय शिंदे यांच्या मोबाईल शॉपीत चोरी झाली कॉलेजच्या युवकांनी हा मोबाईल चोर सापडून दिला. जायखेडा पोलिसांत मोबाईल जमा झालेत. मात्र काहीतरी द्या व मोबाईल परत न्या यासाठी हे मोबाईल अडवून ठेवले. गावातील ग्रामस्थांनी मध्यास्ती केल्यावर हे मोबाईल परत दिले गेलेत. ज्ञानेश्वर देवरेंची दत्त मोबाइल शॉपीत चोरी झाली अनेक मोबाइल चोरीस गेलेत. पंचनामा झाला. गुन्हेगार सापडले नाहीत. चंद्रकांत कांकरिया यांचेकडे चोरी झाली. गुन्हेगार सापडत नाहीत. गुन्हेगार व पोलिस यांच्या खो-खो च्या खेळात गुन्हेगार वरचढ आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. त्यांचा वचक नाही म्हणुन गुन्हेगार बर्याचदा दिवसा ढवळ्या सुद्धा चोर्या करायला कचरत नाहीत.वाघंबा, साल्हेर पासून तर अंबासण पर्यंत अवैध धंद्याचा पसारा मोठा झाला आहे. अवैध वहातुक तेजीत आहे.
चोर-पोलिस खेळात गुन्हेगारी वरचढ नामपुर परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हवे स्वतंत्र ठाणे
By admin | Updated: May 7, 2014 21:28 IST