आठवडे बाजारात चोऱ्या
By Admin | Updated: March 26, 2016 23:19 IST2016-03-26T22:54:13+5:302016-03-26T23:19:04+5:30
आठवडे बाजारात चोऱ्या

आठवडे बाजारात चोऱ्या
नांदगाव : भ्रमणध्वनी,मौल्यवान वस्तंूवर नजरनांदगाव : येथील गुरुवारी आठवडे बाजार असतो. बाजाराचा फायदा घेत काही चोरांनी गोडेतेलाच्या भरलेल्या टाक्या पळवल्याची घटना पुन्हा एकदा घडली.
भगवान महावीर मार्गावर मनोज किराणा या मनोज कासलीवाल यांच्या दुकानासमोर ठेवलेली २०० लिटरची जड टाकी व एस.टी. कॉलनीमधून मनोज चोपडा यांच्या सप्तशृंग किराणासमोरून दोन भरलेल्या टाक्या चोरीला गेल्या. मनोज कासलीवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. गेल्या गुरुवारी चिंंतामणी व मम्मादेवी दुकानातून आयते कपडे चोरण्याच्या घटना घडल्या होत्या.
एका गोडेतेल भरलेल्या टाकीची किंंमत सुमारे १२ हजार रुपये आहे. नांदगावी गुरुवारी आठवडे बाजारानिमित्त परिसरातील ग्रामस्थांची गर्दी असते. याचा फायदा घेत काही चोर वस्तू चोरून नेतात. व्यापारी व दुकानदार रस्त्यावर टाक्या ठेवतात. शिवाय एक टाकी उचलण्यासाठी दोन ते तीन माणसांची गरज असते. यापूर्वी शेळ्या, बकऱ्या चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. (वार्ताहर)