शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड काळे करत चोरट्यांचा एटीएमवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:31 IST

विंचूरची घटना : पावणे पाच लाख रुपयांची रक् क म लंपास

ठळक मुद्देचोरट्यांनी एटीएम बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळा रंग टाकून चेहरे लपविण्याचा प्रयत्न केला.

विंचूर : येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चार लाख ७५ हजार ५०० रु पयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरटयांनी एटीएमबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळा रंग फेकून पुढचा कार्यभाग उरकल्याचे निदर्शनास आले आहे. भल्या सकाळी चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, येथील येवला रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम मंगळवारी (दि.४) सकाळी सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यान चोरट्यांनी फोडले. यावेळी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडून चार लाख ७५ हजार ५०० रु पयांची रोख रक्कम चोरु न नेली. यावेळी सतर्कता म्हणून चोरट्यांनी एटीएम बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळा रंग टाकून चेहरे लपविण्याचा प्रयत्न केला. सकाळी आठ वाजता एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएम मध्ये चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सदर ग्राहकाने बॅकेच्या शाखा व्यवस्थापकास भ्रमनध्वनीद्वारे संपर्कसाधून चोरीची माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापक स्वप्नील सोनजे यांनी लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी घटनास्थळी भेट दिली असता एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेºयावर काळ्या रंगाचा शिडकावा करत कॅमेरा काळा केलेला आढळुन आला. चोरट्यांनी एटीएम कक्षात शिरकाव करत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले आणि रक्कम घेऊन पोबारा केल्याचे उघडकीस आले.एटीएममधील १२ लाख वाचले...बँकेने सोमवारी (दि.३) ३० लाख रु पये एटीएम मध्ये भरले होते. त्यापैकी ग्राहकांनी १३ लाख २४ हजार पाचशे रु पये काढले होते. उर्वरित सोळा लाख ७५ हजार ५०० रु पयांपैकी चोरट्यांनी चार लाख ७५ हजार ५०० रु पयांवर डल्ला मारला. सुदैवाने एटीएम पेटीमध्ये बारा लाखाचा कप्पा चोरटयांना फोडता न आल्याने बँकेचे १२ लाख रु पये वाचले. या अगोदरही याच एटीएमवर चोरट्यांनी दोन वेळा डल्ला मारला होता. मात्र स्टेट बँकेने त्यानंतरही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नाहीत. 

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी