वृद्धेचा लक्ष्मीहार चोरट्यांनी खेचला
By Admin | Updated: July 5, 2014 00:25 IST2014-07-05T00:06:37+5:302014-07-05T00:25:05+5:30
वृद्धेचा लक्ष्मीहार चोरट्यांनी खेचला

वृद्धेचा लक्ष्मीहार चोरट्यांनी खेचला
नाशिकरोड : बिटको चौकातून रस्त्याने पायी जाणाऱ्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार भरदिवसा मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी चोरून नेला.
जुने सिडको येथे राहणाऱ्या वयोवृद्ध विजया विजय सोनार (वय ६२) या बुधवारी जेलरोड कुलथे मंगल कार्यालय येथे लग्न समारंभास आल्या होत्या. लग्न आटोपून त्या पुन्हा रस्त्याने पायी बिटको चौकाकडे जात असताना कॅनरा बॅँक येथे मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातून ४० हजार रुपये किमतीचा लक्ष्मीहार ओढून चोरून नेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुचाकीवर येऊन गळ्यातील दागिने खेचण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. (प्रतिनिधी)