चोरट्यांनी टायर दुकान फोडले
By Admin | Updated: February 28, 2017 00:23 IST2017-02-28T00:23:38+5:302017-02-28T00:23:49+5:30
सटाणा : शहरातील ताहाराबाद रोडवरील एमआरएफ टायरचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाखांचे टायर लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी टायर दुकान फोडले
सटाणा : शहरातील ताहाराबाद रोडवरील एमआरएफ टायरचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाखांचे टायर लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. २७) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला. गेल्या दोन दिवसांत एमआरएफ टायरचे चोरीला गेल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना आहे. सिन्नर, निफाड, इगतपुरी येथील एमआरएफ टायरचे शोरूम फोडून चोरट्यांनी लाखोंचे टायर लंपास केल्याची घटना घडलेली असताना चोरट्यांनी त्यांचा मोर्चा सटाण्याकडे वळविला.
शहरातील ताहाराबाद रोडवर संजय काशीनाथ पवार यांच्या मालकीचे टायर दुकान आहे. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी शरद सोनवणे यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने आणि काचा फुटलेल्या आढळून आल्याने त्यांनी दुकानमालक संजय पवार यांना फोनवर माहिती दिली.
संजय पवार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना दुकानाचे शटर वाकवून चारही कुलुपे तोडून दुकानातील सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली दिसली. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मगर व त्यांचे सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)