बैल चोरणाऱ्या टोळीस अटक
By Admin | Updated: October 27, 2015 23:31 IST2015-10-27T23:30:33+5:302015-10-27T23:31:49+5:30
बैल चोरणाऱ्या टोळीस अटक

बैल चोरणाऱ्या टोळीस अटक
पेठ : शहरातील विविध भागातून चरत असलेल्या बैलांसह इतर जनावरे चोरून बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पेठ पोलिसांना यश आले आहे.
पेठ येथील राजू शेख यांचा साधारण तीस हजार रु पये किमतीचा बैल चरत असताना दिंडोरी येथील युवराज चिंतामण खंबाईत व मिलिंद प्रभाकर दंडगव्हाळ यांनी करंजाळी येथील नातेवाइकाकडे नेला. सुतारपाडा गुजरात येथून खरेदी करून आणल्याचे खोटे सांगून करंजाळीत त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी भाडोत्री वाहनातून सिन्नर येथे बैल बाजारात विक्रीसाठी दाखल केला. इकडे शेख यांना सिन्नर बाजारात बैल विक्र ीसाठी आल्याची खबर लागली. त्यांनी पेठ पोलिसांना तक्र ार दिल्यावर पोलिसांनी सापळा रचून राहता (जि. अ.नगर) येथील एका शेतकऱ्याला बैल विकताना दोघा संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापूर्वीही पेठ परिसरातून बेवारस जनावरे गायब होण्यामागे या बैलचोर टोळीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस निरीक्षक व्ही. डी. ससे तपास करीत आहेत. (वार्ताहर )