शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

ढापे अन् पेव्हर ब्लॉकवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:13 IST

कधी महापालिकेने वृक्षांच्या भोवती बसविलेल्या संरक्षित लोखंडी जाळ्या, तर कधी रस्त्यालगत ठेवलेले डस्टबिनचे झाकण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता तर थेट महापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तयार केलेल्या पदपथावर असलेल्या पेव्हर ब्लॉक अन् गटारांवर बसविलेले ढापे चोरून नेण्याचे धाडस केले आहे.

पंचवटी : कधी महापालिकेने वृक्षांच्या भोवती बसविलेल्या संरक्षित लोखंडी जाळ्या, तर कधी रस्त्यालगत ठेवलेले डस्टबिनचे झाकण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता तर थेट महापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तयार केलेल्या पदपथावर असलेल्या पेव्हर ब्लॉक अन् गटारांवर बसविलेले ढापे चोरून नेण्याचे धाडस केले आहे.  दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरातील रस्त्यावरची ही परिस्थिती आहे. परिसरात राहणाºया काही भुरट्या चोरट्यांनी रस्त्यालगत नागरिकांसाठी तयार केलेल्या पदपथावर बसविलेले पेव्हर ब्लॉक चोरून नेले आहेत. या भुरट्या चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता पदपथावर बंदिस्त केलेल्या गटारांवरचे संरक्षित ढापेदेखील चोरून नेण्याचे धाडस केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून भुरटे चोर महापालिकेच्या मालमत्ता चोरी करून प्रशासनाचे नुकसान करीत आहेत. काही वर्षांपूर्वी महापालिकेने दिंडोरीरोडवर वज्रेश्वरी झोपडपट्टी ते आरटीओ कॉर्नरपर्यंत पदपथ तयार केला होता. या पदपथावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले होते, परंतु चोरट्यांनी पदपथावरचे पेव्हर ब्लॉक काढून नेले आहेत. परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया भुरट्या चोरांचे हे कृत्य असल्याचे बोलले जात आहे.  काही दिवसांपासून पंचवटी परिसरातील पेठरोड, आडगाव नाका, फुलेनगर, हिरावाडी परिसरात भुरट्या चोºया वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पेव्हर ब्लॉक नकोचमहापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तसेच पदपथावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले जाते. पेव्हर ब्लॉकमुळे परिसर आकर्षित दिसतो म्हणून पेव्हर ब्लॉक बसविले जातात, असे पालिकेच्या वतीने सांगितले जाते. मात्र पेव्हर ब्लॉक बसविले जात असताना ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतात, शिवाय पेव्हर ब्लॉक बसविणे म्हणजे केवळ संबंधित ठेकेदाराचे आर्थिक पालनपोषण करणे, असा नागरिकांचा आरोप असल्याने रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नकोच, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा