चोरट्यांचा सुळसुळाट
By Admin | Updated: January 3, 2016 23:41 IST2016-01-03T23:26:24+5:302016-01-03T23:41:53+5:30
चोरट्यांचा सुळसुळाट

चोरट्यांचा सुळसुळाट
जायखेडा : मोसम खोऱ्यात चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, काही दिवसांपासून शेतोपयोगी साहित्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
छोट्या-मोठ्या शेतोपयोगी साहित्यांबरोबरच चोरटे महागड्या वस्तूही चोरून नेऊ लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विठ्ठल गोटू सोनवणे यांच्या वाडीपिसोर शिवारातील शेतशिवारातील विहिरीवरील विद्युतपंप चोरट्यांनी चोरून नेला. यात या शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान झाले. सोनवणे यांनी जायखेडा पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेच्या दोन-तीन दिवसाआधी चोरट्यांनी आखतवाडे येथील देवीदास भाऊराव खैरनार यांच्या भडाणे शिवारातील शेतातील जलपरी चोरून नेली होती. त्यांचेही ५० हजारांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे ठप्प झाले आहे. जायखेडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.(वार्ताहर)
मोकाट जनावरांचा चांदवडला उपद्रव
चांदवड : शहरात काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या जनावरांच्या मालकांनी आपली मोकाट जनावरे त्वरित आपापल्या घरी बांधून ठेवावीत अन्यथा चांदवड नगर परिषदेमार्फत ही मोकाट जनावरे गो-शाळेत रवाना करून संबंधित मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, यांनी दिली आहे़ (वार्ताहर)