शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

आत्याच्या मुलाशी लग्न लावण्यासाठी कुटुंबीयांना गाव सोडायला भाग पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:22 IST

सटाणा : आत्याच्या मुलाशी लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून आत्यासह तिच्या कुटुंबीयांना गाव सोडायला भाग पडल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे उघडकीस आला. याप्रकरणी आतेभावासह त्याचे दोन्ही भाऊ, आई-वडिलांवर सटाणा पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, तिचा आतेभाऊ संतोष श्रीराम सोनवणे ...

सटाणा : आत्याच्या मुलाशी लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून आत्यासह तिच्या कुटुंबीयांना गाव सोडायला भाग पडल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे उघडकीस आला. याप्रकरणी आतेभावासह त्याचे दोन्ही भाऊ, आई-वडिलांवर सटाणा पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, तिचा आतेभाऊ संतोष श्रीराम सोनवणे (रा.अजमिर सौंदाणे) हा तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल म्हणून धमकावत होता. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या नाहीतर मी तुम्हाला गावात राहू देणार नाही अशा धमक्या वारंवार देवून सोनवणे कुटुंबीयांनी पिडीत मुलीचे आई, वडील आणि भावाला मारहाण करत आईचा हात देखील मोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोनवणे कुटुंबियांच्या धाकामुळे पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी गाव सोडून लखमापूर येथे स्थलांतर देखील केले. मुलीला मुलगा पसंत नसल्याने आम्हाला हे लग्न करायचे नाही असे सांगूनही सोनवणे कुटुंबीयांनी दबाव टाकून थेट मुलीवर अ‍ॅसीड टाकण्याची धमकी देत तुमच्या मुलीशी कोण लग्न करतो ते पाहून घेवू असा सज्जड दम भरल्याने अजमिर सौंदाणे येथील संतोष श्रीराम सोनवणे, भगवान श्रीराम सोनवणे, दीपक श्रीराम सोनवणे, मंगलबाई श्रीराम सोनवणे, श्रीराम केदा सोनवणे, यशवंत नवसा नंदाळे, दिनेश यशवंत नंदाळे यांच्यावर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.गुन्हा दाखल करण्याचे आदेशपीडित मुलीने तिच्या आईसह सटाणा पोलीस ठाणे गाठून यापूर्वीच तक्र ार केली होती; मात्र सटाणा पोलिसांनी या गंभीर प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्याने पीडित कुटुंबीयांनी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्र ार केल्याने पोद्दार यांनी सटाणा पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे