सौरकृषी वाहिनीद्वारे दिवसाही होणार वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:46+5:302021-09-04T04:18:46+5:30

उद्योग, वाणिज्य, घरगुती आणि कृषी यासह सर्वच क्षेत्रांना वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी महावितरणच्या खांद्यावर आहे. वीज थकबाकी वसुली हे महत्त्वाचे ...

There will be daytime power supply through solar agriculture channel | सौरकृषी वाहिनीद्वारे दिवसाही होणार वीजपुरवठा

सौरकृषी वाहिनीद्वारे दिवसाही होणार वीजपुरवठा

उद्योग, वाणिज्य, घरगुती आणि कृषी यासह सर्वच क्षेत्रांना वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी महावितरणच्या खांद्यावर आहे. वीज थकबाकी वसुली हे महत्त्वाचे आव्हान असले तरी सक्षम आणि पुरेसा वीजपुरवठा करणे यासाठीचेदेखील नियोजन केले जाते. कृषी वीजजोडणी धोरण २०२० च्या महाकृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून कृषी ग्राहकांना सौरकृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० च्या महाकृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून परिमंडळातील कृषी ग्राहकांना नवीन व तत्काळ वीजजोडणी हे सौरकृषी वाहिनीद्वारे दिवसा वीजपुरवठ्याचे लक्ष्य आहे. घरगुती वीजग्राहकांनी रूफटॉप सौरऊर्जा योजनेत सहभागी होऊन वीजनिर्मिती करावी. यामध्ये ४० टक्क्यांपर्यंत अनुदान ग्राहकांना मिळणार आहे. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प निर्माण करून सौरवाहिनीच्या माध्यमातून कृषिपंपांना दिवसा ८ तास वीज उपलब्ध होणार आहे.

वीज ग्राहकांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. ग्राहकांचे समाधान करण्यासाठीच प्रयत्न केले जातात. कोणत्याही माध्यमातून ग्राहकांच्या आलेल्या तक्रारींचे निराकरण झाले पाहिजे यासाठीच्या सूचना कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

प्रथम प्राधान्य हे उच्चतम ग्राहक सेवेलाच असून नवीन वीज जोडणी, योग्य वीजबिल, अखंडित वीजसेवा यावर नेहमीच लक्ष्य केंद्रित करावे लागते. त्यादृष्टीने नाशिक परिमंडळात कामकाज सुरू आहे.

030921\03nsk_31_03092021_13.jpg

दिपक कुमठेकर, मुख्य अभियंता , नाशिक परिमंडळ

Web Title: There will be daytime power supply through solar agriculture channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.