शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

देशी पिस्तूल अन‌् कट्टे बाळगण्याची ‘क्रेझ’ भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:56 IST

देशी बनावटीचे पिस्तूल असो की, गावठी कट्टे विनापरवाना बाळगण्याची ‘क्रेझ’ शहरात अलीकडे वाढीस लागत असल्याने पोलिसांनी अचानकपणे याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आतापर्यंत शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या धडक कारवाईमध्ये १२ गावठी कट्टे, ११ पिस्तुली आणि ५० काडतुसे जप्त केली आहेत. अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी २२ गुन्हे या दोन कारवायांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देकारवाई : डझनभर कट्टे, ५० काडतुसे अन‌् ११ पिस्तूल जप्त

नाशिक : देशी बनावटीचे पिस्तूल असो की, गावठी कट्टे विनापरवाना बाळगण्याची ‘क्रेझ’ शहरात अलीकडे वाढीस लागत असल्याने पोलिसांनी अचानकपणे याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आतापर्यंत शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या धडक कारवाईमध्ये १२ गावठी कट्टे, ११ पिस्तुली आणि ५० काडतुसे जप्त केली आहेत. अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी २२ गुन्हे या दोन कारवायांमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरात चालू वर्षी अवैधरीत्या अग्निशस्त्रांसह कोयते, तलवारी, चॉपरसारखे घातक शस्त्रे विनापरवाना बाळगणे, तसेच काडतुसांची तस्करी करणाऱ्या टोळीकडून संबंधितांना पुरवठा केला जात असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये घातक धारदार शस्त्रे जप्त करण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे. शहरात अवैधरीत्या अग्निशस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेश राज्यातील विविध शहरांमधून तर तलवारींचा पुरवठा राजस्थानमधून होत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. मध्य प्रदेश, गुजरात या दोन राज्यांच्या सीमा जिल्ह्याला लागून असल्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारांकडून तस्करी वाढू लागली आहे. सराईत गुन्हेगारांना अत्यंत कमीतकमी किमतीत ही शस्त्रे उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर वाढत चालला आहे. गुन्हेगारांमधील आपापसात वादात वा सर्वसामान्यांमध्ये धाक निर्माण करत लूट करण्यासाठी शस्त्रांचा वापर होऊ लागल्याचे विविध घटनांमधून दिसून आले आहे. नाशकात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गावठी कट्टे, पिस्तुली, काडतुसांचा अवैध व्यापाराची पाळेमुळे घट्ट होऊ पाहत असून, शहर व जिल्हा पोलिसांपुढे नव्या वर्षात ही पाळेमुळे उखडून फेकण्याचे आव्हान राहणार आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे पाण्डेय यांच्या ‘टार्गेट’वरपोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अवैधरीत्या शस्त्रे स्वत:जवळ बाळगणाऱ्यांविरुद्ध ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची मोहीम उघडल्यामुळे गुन्हेगारांमध्ये काहीसा वचक निर्माण झाला आहे. आतापर्यंत त्यांच्या आदेशान्वये शहरात सुमारे तीनदा अशी धडक मोहीम राबविली गेली आहे. यामुळे यंदा अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी २२, तर धारदार हत्यारे बाळगल्याप्रकरणी तब्बल ८७ गुन्हे दाखल झालेत आणि तेवढेच शस्त्रे जप्त करण्यात आली.

हत्यारे बाळगण्याचे प्रमाण तिप्पटमागील वर्षभरात शहर पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये गावठी कट्टे आणि पिस्तुली ळगल्याप्रकरणी २१ /गुन्हे दाखल करण्यात आले होते. चालू वर्षभरात मात्र पोलिसांनी धारदार कोयते, चाकू, तलवारी अशी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २३ /गुन्हे दाखल दाखल केले. या वर्षी अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जास्त गुन्हे दाखल झाले होते. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी