मोकळ्या भूखंडावरील कचऱ्यास आग लागली. आग
By Admin | Updated: April 22, 2015 01:43 IST2015-04-22T01:42:52+5:302015-04-22T01:43:59+5:30
मोकळ्या भूखंडावरील कचऱ्यास आग लागली. आग

मोकळ्या भूखंडावरील कचऱ्यास आग लागली. आग
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीमधील एक्सलो पॉइंटजवळीत डी सेक्टरमधील मोकळ्या भूखंडावरील कचऱ्यास आग लागली. आग परिसरात पसरल्यामुळे या भागातील वृक्षारोपण केलेली बरीचशी झाडे जळून खाक झाली तसेच उद्योगाचे व इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचे नुकसान होता होता थोडक्यात बचावले. या भागात धुराचे लोट दिसताच आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, सरचिटणीस राजेंद्र अहिरे यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधला व गाड्या बोलाविण्यात आल्या. त्यामुळे पसरत चाललेली आग आटोक्यात आली.अंबड औद्योगिक वसाहतीमधील मोकळ्या भूखंडांवर बाहेरून आणलेला कचरा आणून टाकला जातो, पण त्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने हा कचरा तसाच साठून राहतो. त्यामुळे अचानक अशा प्रकारच्या आगी लागण्याच्या घटना घडतात. याविषयी आयमाने, एमआयडीसी कार्यालयाशी मोकळ्या भूखंडांना कम्पाउंड करण्याविषयी पत्रव्यवहारही केलेला आहे. वेळीच कम्पाउंड घातले गेले असते तर आजची घटना घडली नसती. तसेच नाशिक महानगरपालिकेलाही अंबड औद्योगिक वसाहतीत सिमेन्स कंपनीजवळ फायरस्टेशनसाठी मंजूर झालेल्या भूखंडावर अग्निशमन दलाची स्थापना होईपर्यंत एक अग्निशमन दलाचा बंब ठेवण्यात यावा त्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी लवकर पोहोचेल व नुकसान कमी होईल हा त्यामागचा हेतु होता.