शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नाशकातून द्राक्ष निर्यातीत तिप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:29 IST

द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून युरोपसह विविध देशांमध्ये यावर्षी आतापर्यंत सुमारे सव्वापाचशे कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारीपर्यंत इंग्लंड, युरोप व रशियासह अन्य देशांमध्ये १८२ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यावर्षी द्राक्षांना प्रतिकिलो ८० रुपयांपर्यंत समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकºयांनाही दिलासा मिळाला आहे.

नामदेव भोर ।नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून युरोपसह विविध देशांमध्ये यावर्षी आतापर्यंत सुमारे सव्वापाचशे कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारीपर्यंत इंग्लंड, युरोप व रशियासह अन्य देशांमध्ये १८२ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यावर्षी द्राक्षांना प्रतिकिलो ८० रुपयांपर्यंत समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकºयांनाही दिलासा मिळाला आहे.  गेल्यावर्षी उत्पादन वाढूनही युरोपात चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत उशिरा दाखल झालेल्या नाशिकच्या  द्राक्षांचा लहान आकार व साखरेचे कमी प्रमाण यामुळे अपेक्षित भाव न मिळाल्याने द्राक्षबागायतदारांची निराशा झाली होती. मात्र या हंगामात द्राक्षबागांना चांगला बहर आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे उत्पादनातही मोठी वाढ झाली. परंतु जिल्ह्णात द्राक्षमण्यांची वाढ व साखरभरणी होण्याच्या काळात ओखी वादळाचा द्राक्षबागांना फटका बसला. त्यानंतरच्या जवळपास आठवडाभराच्या काळात शहरात ढगाळ वातावरणामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी द्राक्षबागा डोळ्यात तेल घालून जपल्या. घडांवरील कागद बदलण्यापासून डावणी, बुरशी, मावा पसरू नये यासाठी विशेष काळजी घेतली. त्यामुळे नाशिकच्या द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या युरोप व इंग्लंडमध्ये यावर्षी नियोजित वेळेत द्राक्षांची निर्यात करणे शेतकºयांना शक्य झाले. नाशिक जिल्ह्णातून यावर्षी सुमारे ४० ते ४५ हजार एकरवरील जवळपास ३४ हजार प्लॉटची नोंदणी झाली असून, आतापर्यंत इंग्लंडसह युरोपमध्ये प्रत्येकी १२ टन वजनाच्या २७० कंटेनरची निर्यात झाली असून, रशियासह अन्य देशांमध्ये सुमारे प्रत्येकी १६ टन वजनाचे ३५० कंटेनर निर्यात झाले आहेत.ओखी वादळाचा फटका व त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे यावर्षी शेतकºयांना द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना मोठ्या प्रमाणात डावणी, बुरशी, भुरी, मावा प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागली. परंतु हंगामाच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक भाव मिळाल्याने बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. परंतु, नाशिकच्या द्राक्षांना इंग्लंडसह युरोपमध्ये चिलीच्या द्राक्षांची स्पर्धा असल्याने द्राक्ष उत्पादकांनी अधिक गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.- माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ चिलीतील द्राक्षांच्या तुलनेत भारतीय द्राक्ष आकाराने लहान व कमी गोड असल्यामुळे नाशिकच्या द्राक्षांना गेल्यावर्षी जानेवारीनंतर मागणी घटली होती. परिणामी द्राक्षांचे भाव घसरल्याने निर्यातदारांना नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे यावर्षी द्राक्षनिर्यातदारांनी सुरुवातीपासूनच निर्यातीवर भर दिल्याने आतापर्यंत इंग्लंडसह युरोपमध्ये २७०, तर रशियास अन्य देशांमध्ये ३५० कंटेनरची निर्यात झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी