पंचवटी परिसरात उद्या संध्याकाळी पाणीपुरवठा नाही
By Admin | Updated: July 21, 2016 23:19 IST2016-07-21T23:12:22+5:302016-07-21T23:19:35+5:30
व्हॉल्व्ह दुरुस्ती : रविवारीही सकाळचा पुरवठा बंद

पंचवटी परिसरात उद्या संध्याकाळी पाणीपुरवठा नाही
नाशिक : पंचवटी विभागातील म्हसरुळ आणि बोरगड जलकुंभ भरणाऱ्या मुख्य उर्ध्ववाहिनीचे जलशुद्धीकरण केंद्रात व्हॉल्व्ह दुरुस्ती व गळती बंद करण्याचे काम शनिवारी (दि.२३) हाती घेण्यात येणार असल्याने पंचवटी परिसरात काही भागांत शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी (दि.२४) सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
येत्या शनिवारी (दि.२३) प्रभाग क्रमांक १ मधील म्हसरूळ गाव, दिंडोरीरोडची पूर्व बाजू कलानगर परिसर, प्रभाग क्रमांक ५ मधील गणेशनगर, टी. बी. सॅनेटोरिअम परिसर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर आणि प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठरोड, जकात नाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर आदि परिसरात संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.