पूर्व विभागात आज पाणीपुरवठा नाही
By Admin | Updated: July 19, 2014 00:57 IST2014-07-19T00:28:13+5:302014-07-19T00:57:48+5:30
पूर्व विभागात आज पाणीपुरवठा नाही

पूर्व विभागात आज पाणीपुरवठा नाही
नाशिक : पश्चिम विभागातील बाराबंगला ते पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राला अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या थेट जलवाहिनीला पंपिंग स्टेशन, गंगापूररोड येथे अचानक गळती होत असल्याने सदर वाहिनी दुरुस्तीचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण पंचवटी परिसरासह नाशिक पूर्व विभागातील शंकरनगर, द्वारका, टाकळीरोड, सिंगापूर गार्डन, काठे गल्ली, माणेकशा नगर, बनकर मळा, अनुसयानगर आदि परिसरामध्ये शनिवारी (दि. १९) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच रविवारी (दि. २०) सकाळचा पाणीपुरवठादेखील कमी दाबाने होणार असल्याचे पालिकेचे अधीक्षक अभियंता यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)