जुन्या नाशकात उद्या दुपारी पाणी नाही

By Admin | Updated: May 24, 2014 00:22 IST2014-05-24T00:20:29+5:302014-05-24T00:22:21+5:30

नाशिक : द्वारका सर्कल येथे जलवाहिनीच्या कामामुळे रविवारी जुन्या नाशिकमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. द्वारका सर्कल येथे ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नानावली परिसर, कथडा परिसर, स्मशानभूमीरोड, मीरा दाताररोड, चोपन्न क्वॉर्टर, कोळी वाडा, बागवानपुरा, होळी गल्ली या भागांत रविवारी (दि. २५) पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सोमवारी (दि. २६) सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

There is no water in the old Nashik tomorrow afternoon | जुन्या नाशकात उद्या दुपारी पाणी नाही

जुन्या नाशकात उद्या दुपारी पाणी नाही

नाशिक : द्वारका सर्कल येथे जलवाहिनीच्या कामामुळे रविवारी जुन्या नाशिकमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. द्वारका सर्कल येथे ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नानावली परिसर, कथडा परिसर, स्मशानभूमीरोड, मीरा दाताररोड, चोपन्न क्वॉर्टर, कोळी वाडा, बागवानपुरा, होळी गल्ली या भागांत रविवारी (दि. २५) पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सोमवारी (दि. २६) सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

Web Title: There is no water in the old Nashik tomorrow afternoon