नाशिकरोड परिसरात आज पाणी नाही
By Admin | Updated: October 31, 2015 23:16 IST2015-10-31T23:14:20+5:302015-10-31T23:16:59+5:30
नाशिकरोड परिसरात आज पाणी नाही

नाशिकरोड परिसरात आज पाणी नाही
नाशिक : प्रभाग क्रमांक ३८ मधील गांधीनगर, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी व व्हॉल्व्ह दुरुस्ती केली जाणार असल्याने भागातील पाणीपुरवठा रविवार (दि.१) बंद राहणार आहे.
प्रभाग ३८ मधील डीजीपीनगर क्रमांक एक, विधातेनगर, खोडेनगर, अशोकामार्ग, रॉयल कॉलनी, हॅप्पी होम कॉलनी, पखालरोड, रझा कॉलनी आदि भागांतील दुपार-संध्याकाळ व रात्रीचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे. तसेच सोमवारी (दि.२) रोजी नाशिकरोड विभागातील सर्व प्रभागातील आणि पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३१, ३७, ३८ मधील परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. (प्रतिनिधी)