शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत आघाडी सत्तेवर येईल, असा दावा करतानाच कॉँग्रेस आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही व तसा प्रयत्नही सुरू नसल्याचा निर्वाळा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला  आहे.नाशिक येथे उत्तर महाराष्टÑातील कॉँगे्रस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी थोरात बोलत होते. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली हे मान्य मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली ते आपल्याला माहिती नाही. असे सांगून थोरात यांनी, सध्या भाजपकडून देशपातळीवर विरोधी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात असून, त्यातील काहींना चौकशीची भीती आहे, तर काहींना लोकसभा निवडणुकीनंतरअसुरक्षित वाटू लागल्याने ते भाजपत प्रवेश करीत आहेत, मात्र बाहेरच्या लोकांच्या येण्याने मूळ भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येदेखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.‘आमचे काय’ असा प्रश्न ते विचारू लागले असून, एकनाथ खडसे यांचे विधीमंडळातील भाषण हा त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले. कॉँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांनी जावे, त्यांना अडवणार नाही, असे सांगून थोरात यांनी, पक्षावर अशा प्रकारे परिस्थिती पहिल्यांदाच ओढवलेली नाही. यापूर्वीही अशा प्रसंगाना पक्ष सामोरे गेला व नव्याने उभारी घेऊन उभा राहिला आहे. जे गेले त्यांच्या ऐवजी नव तरुणांना संधी देऊन ही उणीव आपण भरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्ताबद्दल बोलताना थोरात यांनी त्या निव्वळ वावड्या असल्याचे सांगितले व अशा प्रकारचा प्रचार करण्यात भाजपाच अग्रस्थानी असून, त्यांच्या रणनितीचा तो भाग असल्याचा आरोप केला. देशपातळीवर होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना दुर्दैवी असून, गरीब, अल्पसंख्याक समाजावर हल्ले, धमक्या देण्याचे प्रकार घडू लागले आहेत, त्याचे समर्थक कोणी करू नये. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी पुढाकार घ्यावा व मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपविली असून, जागोजागी मेळावे, बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत आहोत, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरल्याचे समजू शकतो. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले व सर्वांना बरोबर घेऊन चालणाºया उमेदवारांना पक्ष संधी देईल, असेही थोरात यांनी शेवटी सांगितले. यावेळी प्रभारी चांद रेड्डी, मुजफ्फर हुसेन, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवतेशिवसेना व भाजपत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या प्रचाराबाबत बोलताना थोरात यांनी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, मराठवाडा, विदर्भात अद्यापही पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. शेतकरी अडचणीत आला आहे, आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अशी परिस्थिती असताना सत्तेतील लोक मुख्यमंत्रिपदाची चर्चा करतातच कशी असा प्रश्न केला. सरकारने दुष्काळी परिस्थितीवर लक्ष द्यावे, तसेही मुख्यमंत्री कोण हे शेवटी जनताच ठरवत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसMNSमनसे