आंदोलनात बहुजन फोरमचा सहभाग नाही
By Admin | Updated: December 5, 2015 23:03 IST2015-12-05T23:02:29+5:302015-12-05T23:03:01+5:30
वीज कंपनीतील संघटनांचे आंदोलन

आंदोलनात बहुजन फोरमचा सहभाग नाही
नाशिकरोड : राज्यातील वीज वितरण, पारेषण व निर्मिती कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या वीज कंपन्यांतील सहा संघटनांच्या प्रस्तावित आंदोलनामध्ये बहुजन फोरमचा समावेश नसल्याची माहिती फोरमचे राज्य महासचिव राजन शिंदे, उपाध्यक्ष एम. बी. आहिरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
फोरमच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तिन्ही कंपन्यांतील कामगार वेगवेगळ्या विविध गंभीर प्रश्नांना तोंड देत आहे. व्यवस्थापनाने कामाचा बोजा वाढवल्याने कामगारांचे खच्चीकरण होत असून, कामगार दडपणाखाली काम करीत आहेत. कामगारांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबितच आहे. मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही कंत्राटी तत्त्वावर नेमणुकीचे धोरण स्वीकारल्यामुळे त्यांची आर्थिक गळपेची होत आहे.
या बाबींविरुद्ध या संघटनांनी कधीही आवाज उठविलेला नाही. तसेच फोरमला विश्वासात न घेता या आंदोलनाची नोटीस बजविण्यात आल्याने या आंदोलनात फोरम सहभागी होणार नाही, असे
पत्रकात नमूद करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)