शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मर्चंट बॅँकेची बिनविरोध निवडीसाठी चर्चाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:36 IST

नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागमार समर्थक माजी संचालकांच्या प्रगती पॅनलकडून कोणत्याही प्रकारे प्रस्ताव सादर नाही, असे असताना मतदारांची सहनुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चा पसरविल्या जात असल्याचा दावा सहकार पॅनलचे नेते गजानन शेलार यांनी केला आहे. प्रतिस्पर्ध्यांविषयी आमचा कोणताही दुराग्रह नाही, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी सज्ज असून २३ नोव्हेंबर रोजी उमेदवार घोषित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘सहकार’चा दावा : मैत्रीपूर्ण लढत;पुढील आठवड्यात उमेदवारांची नावे घोषित करणारनम्रता पॅनलची पहिली यादी घोषित

नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागमार समर्थक माजी संचालकांच्या प्रगती पॅनलकडून कोणत्याही प्रकारे प्रस्ताव सादर नाही, असे असताना मतदारांची सहनुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चा पसरविल्या जात असल्याचा दावा सहकार पॅनलचे नेते गजानन शेलार यांनी केला आहे. प्रतिस्पर्ध्यांविषयी आमचा कोणताही दुराग्रह नाही, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी सज्ज असून २३ नोव्हेंबर रोजी उमेदवार घोषित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.नाशिक मर्चंट बॅँक निवडणुकीच्या घोषणेनंतर आता ज्वर वाढला आहे. या बॅँकेतील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या बागमार समर्थक माजी संचालकांनी प्रगती पॅनल केले असून ललित मोदी, गजानन शेलार, भास्करराव कोठावदे, अजय ब्रह्मेचा यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलदेखील निवडणुकीसाठी सज्ज आहे. बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून बॅँकिंग फेडरेशनने मंगळवारी (दि.१३) गोविंदनगर येथेही बैठक बोलावली होती. या बैठकीत सहकार पॅनलने दहा जागा मागितल्या. प्रगतीमध्ये १० माजी संचालक असल्याने ही मागणी पूर्ण करता येत नसल्याचे प्रगती पॅनलचे नेत्यांनी जाहीर केले होते. त्यास सहकारचे नेते गजानन शेलार यांनी हरकत घेतली आहे.बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झाले असल्याचे सांगितले जात असले तरी सहकारकडे असा कोणीही प्रस्ताव मांडलेला नव्हता, त्यामुळे कोणत्याही प्रकारे या जागा सोडण्याची केलेली मागणी निखालस खोटी आहे. मतदारांची सहानुभूती मिळण्यासाठी अशाप्रकारे प्रयत्न सुरू असून, त्याची पुनरावृत्ती झाल्यास मग मात्र जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले. सहकार पॅनलचा कोणाविषयी पूर्वग्रह दूषित नाही. ज्यांच्याकडे १९ संचालक आहेत असे म्हणणे आहे त्यांची तयारी असल्याने कोणाचीही संधी हुकविण्याची आमची तयारी नाही. आमचे पॅनल तयार असून, येत्या २३ तारखेला सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले.नम्रता पॅनलची पहिली यादी घोषितनाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीतील अजित हुकूमचंद बागमार प्रणीत नम्रता पॅनलच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (दि.१५) घोषित करण्यात आली आहे. अनेक प्रकारचे दबाव येत असल्याने उर्वरित यादी आता २५ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येईल, अशी माहिती बागमार यांनी दिली.हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र असलेल्या अजित बागमार यांनी वडिलांच्या नम्रता पॅनलखालीच निवडणूक लढविण्याची तयारी केली. त्यानुसार त्यांनी काही जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत.त्यानुसार सर्वसाधारण गटातून अजित हुकूमचंद बागमार, प्रवीण तिदमे, अनंता सूर्यवंशी, भास्कर निकम, दिलीप पवार (त्र्यंबक/ घोटी), धरमचंद पगारिया (सुरगाणा/ पेठ), अनिल भोर (निफाड), विनोद ललवाणी (श्रीरामपूर) असे सर्व भागांना प्रतिनिधित्व देणारे उमेदवार दिल्याचे बागमार यांनी सांगितले तर अनुसूचित जाती जमाती गटातून महेश पठाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.सदरच्या चुरशीच्या निवडणुकीत मतदानात विभागणी होऊ नये यासाठी माघारीसाठी अनेक उमेदवारांवर दबाव येत असून त्यामुळे गुरुवारी (दि.१५) केवळ आठ नावे घोषित करण्यात आली. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांची नावे घोषित करण्यात येईल, असे बागमार यांनी सांगितले.

टॅग्स :ElectionनिवडणूकBanking Sectorबँकिंग क्षेत्र