शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पदे अडकवून ठेवणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:35 IST

दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस

ठळक मुद्देवालसी चांदरेड्डी : कॉँग्रेस अध्यक्षांचे पदग्रहण उत्साहात

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कॉँग्रेस पक्षाची जडणघडण कार्यकर्त्यांच्या बळावर झाली असून, पक्षात काम करणा-या प्रत्येकाला वेळोवेळी पक्षाने मानाचे स्थान दिले आहे, परंतु पक्षाचे काम न करता निव्वळ पदे अडकवून ठेवणा-यांना यापुढे पक्षात स्थान मिळणार नसल्याचे सांगतानाच अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वालसी चांदरेड्डी यांनी, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्याचे जाहीर करून शेवाळे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करणा-यांची तोंडे बंद केली आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व उत्तर महाराष्टÑाचे प्रभारी वालसी चांदरेड्डी यांच्या उपस्थितीत शेवाळे यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी बोलताना रेड्डी यांनी, पक्षाची वाटचाल अवघड वळणावर असली तरी, पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी देश पिंजून काढत असून, येणाºया निवडणुकीच्या तयारीला पक्ष कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे. एकाच पदावर पंधरा वर्षांपेक्षा अधिक झालेल्या जिल्हाध्यक्षांना बदलण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यात खांदेपालट करण्यात आले आहेत. त्यामुळे हा फेरबदल कॉँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त करून देईल, त्यासाठी सर्वांनी शेवाळे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी. निवडणूक तयारीचा भाग म्हणून ब्लॉकनिहाय बूथ कार्यकर्ते नेमावे लागणार असून, आगामी काळात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय अशा बूथ कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना नवनियुक्त डॉ. तुषार शेवाळे यांनी, पद हे कामासाठी असते भूषणासाठी नाही याची आपल्याला जाणीव असून, पक्ष संक्रमण अवस्थेतून जात असल्याची जाणीव ठेवूनच आपली आगामी वाटचाल राहणार आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांशी माझी बांधिलकी असल्यामुळे आपल्या कार्यकाळात गटबाजीला कोणताही थारा नसेल असे सांगून शेतमालाला भाव, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई आणि तरुण शेतकºयांची आत्महत्या अशा घटनांचे आव्हान समोर उभे असल्याने त्याविरुद्ध सरकारला जाब विचारला जाईल, त्याचबरोबर पक्षकार्य करताना शहर व ग्रामीण अशी फळी न ठेवता एकदिलाने काम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सध्या जिल्हा कार्यकारिणी आहे तशीच ठेवण्यात येणार असून, याच कार्यकारिणीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाईल, अशी घोषणा केली. मावळते अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी, जिल्हाध्यक्षपद हे काटेरी मुकुट असून, ज्यावेळी यश मिळते त्याचे सामूहिक श्रेय घेतले जाते, परंतु पराभवाचा धनी एकटाच असतो; अशी खंत बोलून दाखविली. जिल्ह्यातच नव्हे तर देशपातळीवरच पक्षासाठी कठीण काळ असल्याने आपापसातील मतभेद ठराविक पातळीवरच मिटविण्यात यावे, असे आवाहन केले.याप्रसंगी माजी मंत्री विनायकदादा पाटील, डॉ. शोभा बच्छाव, आमदार निर्मला गावित, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, माजी आमदार शिरीष कोतवाल, अनिल आहेर, शरद आहेर, संपत सकाळे, प्रभारी डी. जी. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यास माजी आमदार नाना बोरस्ते, प्रताप वाघ, निर्मला खर्डे, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे, हेमलता पाटील, स्वप्नील पाटील, सुनील आव्हाड यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस