शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

...तर वर्षा सहलीचा आनंद होईल द्विगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:25 AM

मान्सूनच्या जलधारांचा वर्षाव होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत वसुंधरेला जणू हिरवा शालूचा साज चढलेला पहावयास मिळेल. याबरोबरच पावसाळी पर्यटनाचे वेध लागण्यास सुरुवात होईल. वर्षा सहलीचा आनंद लुटतान्ाां नेमकी काय खबरदारी घ्यावी,

मान्सूनच्या जलधारांचा वर्षाव होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत वसुंधरेला जणू हिरवा शालूचा साज चढलेला पहावयास मिळेल. याबरोबरच पावसाळी पर्यटनाचे वेध लागण्यास सुरुवात होईल. वर्षा सहलीचा आनंद लुटतान्ाां नेमकी काय खबरदारी घ्यावी, याबाबत राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्याशी साधलेला संवाद ...वर्षा सहलीसाठी कोणत्या परिसराची निवड करता येईल?पावसाळा म्हटला की, सर्वदूर निसर्गाचे वेगळेच मनमोहक रूपडे पहावयास मिळते. सर्वत्र हिरवळ, सरींचा वर्षाव, डोंगरांवरुन वाहणाऱ्या जलधारा असे वातावरण नाशिक जिल्ह्यात नक्कीच अनुभवता येणार आहे. यासाठी ‘वीकेण्ड ट्रीप’चा बेत आखण्यास हरकत नसावी. गंगापूर धरणापासून ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांमध्ये भटकंतीला प्राधान्य द्यावे. भावली, अंजनेरी, पेगलवाडी-पहिणे, वैतरणा, घाटनदेवी, भंडारदरा, कसारा जव्हार, मोखाडा या भागांना भेटी देता येतील.पावसाळी पर्यटन करताना काय खबरदारी घ्यावी?पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापूर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थित तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे, घाटमार्ग, धरण परिसरांत बेभानपणे वर्तन अजिबात अपेक्षित नाही. प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगावी. आपल्यामुळे कोणाच्या आनंदावर पाणी फिरणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिउत्साहीपणा प्रत्येकाने टाळायला हवा. सूचना फलकांच्या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. पर्यटनस्थळांवर स्वच्छता राखावी, मद्यप्राशनासाठी पावसाळी पर्यटनाचा बेत आखणे धोक्याचे ठरेल.आपत्कालीन परिस्थितीत काय करावे?पावसाळी पर्यटनाला बाहेर पडताना सोबत पॉवरबॅक ठेवावी जेणेकरून मोबाइल बंद पडणार नाही. पर्यटन करताना कोठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्यासारख्याच त्या पर्यटकांनाही मदतीचा हात द्यावा. मोबाइल नेटवर्क मिळत नसले तरी आपत्कालीन १००, १०१, १०८ हे क्रमांक डायल होतात. त्यावरून निश्चित स्वरूपाची मदत मिळवावी. नेटवर्क असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अपघातांच्या घटनांकडे दुर्लक्ष करू नये.धबधब्यांचे सौंदर्य क से न्याहाळावे?पावसाळ्यात धबधबे ओसंडून वाहतात. जिल्ह्यांत धबधब्यांची संख्या अधिक आहे. धबधब्यांचे रूपडे लांब अंतरावरून डोळ्यांत साठवावे. धबधब्यांजवळ जाणे कटाक्षाने टाळावे.पावसाळी पर्यटनाचा आनंद नागरिकांनी अवश्य लुटावा; मात्र हा आनंद लुटताना आपण बेभानपणे वागणार नाही ना? या प्रश्नाचे उत्तर स्वत:ने स्वत:ला विचारावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा. पावसाळी पर्यटनासाठी जाताना बेभान होऊन चालणार नाही. बेभानपणे पर्यटनाच्या नावाखाली केले जाणारे वर्तन निसर्ग, पर्यावरणासह स्वत:च्या जिवालाही घातक ठरणारे आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनात सतर्कता बाळगणे तितकेच गरजेचे.‘सेल्फी’साठी आटापिटा नकोजुलै आणि आॅगस्ट हे दोन महिने अर्थात आषाढ अन् श्रावण या मराठी महिन्यांत पावसाळी पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटतांना मद्यप्राशनाचा मोह आवर्जून टाळावा तसेच ‘सेल्फी’ घेण्यासाठी आटापिटा करू नये, जेणेकरून आपली व आपल्या मित्रपरिवाराची सुरक्षा धोक्यात येणार नाही. पावसाला सुरूवात झाली असून, जुलैच्या दुसºया आठवड्यापासून निसर्गाचे रूपडे पालटलेले दिसून येण्यास सुरूवात होईल.

टॅग्स :tourismपर्यटनRainपाऊस