...तर पाणीकपातीचे संकट

By Admin | Updated: July 7, 2015 00:03 IST2015-07-06T23:59:23+5:302015-07-07T00:03:06+5:30

...तर पाणीकपातीचे संकट

... then water crisis crisis | ...तर पाणीकपातीचे संकट

...तर पाणीकपातीचे संकट

नाशिक : गेल्या वर्षी ६ जुलैला गंगापूर धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाही नाशिक महापालिकेने ७ जुलैपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करत कपातीचे धोरण राबविले होते. यंदा गंगापूर धरणात आजमितीला ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी पाऊस लांबल्यास शहरावर मागील वर्षाप्रमाणेच पाणीकपातीचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तूर्त मनपा व जिल्हा प्रशासनाने पाणीनियोजनाबाबत सावध पवित्रा घेतला असला तरी पाऊस लांबल्यास त्यांच्यावरही चिंतेचे ढग कायम आहेत.
मागील वर्षी गंगापूर धरणात ६ जुलै रोजी १९७४ द.ल.घ.फू. म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. परंतु मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने आॅगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असतानाही नाशिक महापालिकेने सावधगिरीची भूमिका घेत ७ जुलै २०१४ पासून शहरात पाणीकपातीचे धोरण राबविण्यास सुरुवात केली होती.

Web Title: ... then water crisis crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.