..अखेर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना लागला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:14+5:302021-08-13T04:18:14+5:30
नाशिक पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा गुन्हे शाखा, विशेष शाखा, नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ...

..अखेर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना लागला मुहूर्त
नाशिक पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा गुन्हे शाखा, विशेष शाखा, नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर त्यांच्या नियमाने बदल्या केल्या जातात. मात्र, नाशिक पोलीस आयुक्तालयात पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांचे अर्ज घेऊन महिना लोटला तरी कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या नसल्याने कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत होते.
काल मंगळवारपासून बदलीप्रक्रिया सुरू झाली असून, त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस शिपाई यांच्या बदल्यांचे काम कागदोपत्री सुरू केले आहे, असे समजते.
पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड, अंबड, देवळाली कॅम्प, भद्रकाली, आडगाव, पंचवटी, उपनगर, सरकारवाडा, गंगापूर यासह विशेष शाखा, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष या ठिकाणी कार्यरत असलेल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. शासकीय नियमानुसार, त्यांच्या बदल्या केल्या जातात, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी पोलीस प्रशासनातर्फे अर्ज मागविले होते. सदर कर्मचाऱ्यांचे अर्ज घेऊन महिना लोटला होता.
येत्या आठवड्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे बदली गॅझेट प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयामार्फत बदलीप्रक्रिया सुरू केल्याने विविध पोलीस ठाण्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या बदलीपात्र शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांना आता नवीन बदली झालेल्या ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.