शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

...तर मिळेल पोलिसांकडून नववर्षाचे गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:25 IST

नाशिक : ह्यथर्टी फर्स्टह्णजल्लोषाच्या नावाखाली यंदा सार्वजनिकरीत्या एकत्र येत कुठल्याही प्रकारे आनंदोत्सव कोणालाही शहरात कोठेही साजरा करता येणार नसल्याचे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे३० ठिकाणी नाकाबंदी : नाइट कर्फ्यूची प्रभावी अंमलबजावणी; थर्टी फर्स्टचा जल्लोष घरातच हवा

नाशिक : ह्यथर्टी फर्स्टह्णजल्लोषाच्या नावाखाली यंदा सार्वजनिकरीत्या एकत्र येत कुठल्याही प्रकारे आनंदोत्सव कोणालाही शहरात कोठेही साजरा करता येणार नसल्याचे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आपआपल्या घरात राहून नववर्षाचा आनंद कुटुंबासमवेत घ्यावा, गुरुवारी (दि.३१) रात्री ११ वाजेपासून शुक्रवारी (दि.१) सकाळी सहा वाजेपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयाच्या १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ३ हजार पोलीस रस्त्यावर राहणार आहे. एकूण ३० ठिकाणांवर कडक नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास, त्यास नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांकडून कारवाईचे ह्यगिफ्टह्ण दिले जाऊ शकते.या वर्षी सर्वच सण उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडले. लॉकडाऊन शिथिल होऊन अर्थचक्राला गती मिळत असताना, काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भावही शहरात नियंत्रणात येत आहे. यामुळे कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सार्वजनिकरीत्या नाशिककरांनी थर्टी फर्स्टला एकत्र येणे टाळावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे. शहरात गुरुवारी रात्री ११ वाजेपासून तर थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही परिमंडळाचे उपायुक्त, सहायक आयुक्त, गुन्हे शाखेचे उपायुक्त, सहायक आयुक्तांसह विशेष शाखा, महिला शाखांचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर पहारा देणार आहेत, तसेच सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस नियंत्रण कक्षाच्या ह्यॲलर्टह्णवर ठेवले जाणार असून, पेट्रोलिंग वाहने अधिकाधिक सक्रिय कसे राहतील, या दृष्टीने सूक्ष्मरीत्या नियोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (गुन्हे) संग्रामसिंह निशाणदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दुकानांचे शटर ११ वाजता होणार डाऊनशहरातील सर्व प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल यांचे शटर गुरुवारी रात्री ११ वाजता बंद होतील. जे दुकानदार याविरुद्ध कृती करताना आढळतील, त्यांच्यावर थेट गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.घरगुतीच्या नावाखाली सार्वजनिक हुल्लडबाजी नकोइमारतीचे पार्किंग असो की टॅरेस, कोठेही सार्वजनिकरीत्या कोणीही परिरसरातील नागरिक एकत्र जमणार नाही, असेही निशाणदार यांनी स्पष्ट केले आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जर अशा प्रकारे कोठे ह्यहुल्लडबाजीह्ण दिसून आली, तर संबंधित सोसायटी किंवा इमारतीच्या अध्यक्ष व सचिवांनाही कारावाईला सामोरे जावे लागू शकते.नशेबाजांवर पोलिसांचा ह्यवॉचह्णमद्यपी तरुणाईवर पोलिसांचा विशेष ह्यवॉचह्ण राहणार आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत शहरातील कानाकोपऱ्यात पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाईल. या नाकाबंदीत मद्यप्राशन करत किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :New Yearनववर्षPoliceपोलिस