शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मग रहा ना गप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:32 AM

महानगरातील एक उमेदवार दररोज सकाळी लवकर उठून मोजक्या निकटच्या कार्यकर्त्यांसह लगतचे जॉगिंग ट्रॅक, मैदाने गाठून तेथील प्रचार उरकून घेत आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत आपले ‘हक्काचे’ कार्यकर्ते घेऊन एकेका भागातील प्रचाराला प्रारंभ करीत आहेत.

ठळक मुद्देभटक्या

महानगरातील एक उमेदवार दररोज सकाळी लवकर उठून मोजक्या निकटच्या कार्यकर्त्यांसह लगतचे जॉगिंग ट्रॅक, मैदाने गाठून तेथील प्रचार उरकून घेत आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत आपले ‘हक्काचे’ कार्यकर्ते घेऊन एकेका भागातील प्रचाराला प्रारंभ करीत आहेत. त्यात सर्वप्रथम त्या भागातील मंदिर, गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेणे किंवा दर्ग्यावर जाऊन चादर चढवून प्रचाराचा प्रारंभ करतात. त्यातून उमेदवारांचा त्या भागातील स्थानिक नागरिकांशी ‘कनेक्ट’ वाढतो, अशीच त्यामागे उमेदवाराची भावना आहे. उमेदवारांच्या या कृतीमुळे कधी चार-सहा महिने देवदर्शन न करणारे ‘हक्काचे’ प्रमुख कार्यकर्तेदेखील उमेदवाराच्या पाठोपाठ मंदिरापर्यंत पोहोचून देवदर्शन घेताना दिसतात, तर अनेक ‘रोजंदारी’ कार्यकर्ते मंदिराबाहेरील पानाच्या दुकानात, आपापल्या दुचाकींवर रस्त्यांच्या मध्यभागी उभे राहून झेंडे फडकवित प्रचाराचे काम चोखपणे करीत असतात. त्यानंतर दिवसभर प्रचाराच्या रणधुमाळीत घालविल्यावर कार्यकर्ते रात्री दहापर्यंत उमेदवाराच्या संपर्क कार्यालयातून बाहेर पडतात. दररोजच्या अशा देवदर्शनाला वैतागलेल्या एका कार्यकर्त्याने ‘प्रमुख’ पदाधिकाऱ्याला भाऊ तेवढं दररोजचं सकाळचं जबरदस्तीचं देवदर्शन बंद करायला लावा हो. असे म्हणताच तो भाऊ मोठ्या आवाजात बोलला ‘अरे सोन्या सकाळच्या देवदर्शनामुळेच रात्रीला लक्ष्मीदर्शन होतंय, मग रहाय ना गप्प.’ त्या भावाने असे म्हणताच भाऊच्या संपर्क कार्यालयात प्रचंड हास्यस्फोट झाला.टोप्या बदलल्या तरीआमच्या समस्या त्याच !विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आपापल्या परिने प्रचार कार्याला लागले आहेत. यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच नीतींचा वापर होत आहे. उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांची आवश्यक ती सर्व प्रकारची काळजी घेत असून, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करता येईल याचेदेखील नियोजन करण्यात येत असल्याचे दिसते. त्याप्रमाणे कार्यकर्तेदेखील आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक प्रभागात, कॉलनीमध्ये आणि नववसाहतीत जाऊन मतदारांच्या घरभेटी घेत आहेत. केवळ आताच्या काळात कार्यकर्त्यांच्या भरोशावर राहून चालणार नाही, असे लक्षात आल्याने काही उमेदवारांनी प्रचारपत्रके वाटपासाठी रोजंदारीवर माणसे नेमलेली आहेत. एका नववसाहतीमध्ये चार-पाच महिला भर दुपारी एका उमेदवाराची प्रचारपत्रके वाटत होत्या. दुपारीची वेळ असल्याने फारशी रहदारी नव्हती. एका कॉलनीमध्ये या महिला प्रचारपत्रके वाटप करण्यासाठी गेल्या तेव्हा उन्हासाठी उमेदवाराचे प्रचारचिन्ह असलेल्या टोप्या डोक्यावर होत्या. प्रचारपत्रक वाटप सुरू असताना कॉलनीतील महिलांनी आपले प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. तेव्हा प्रचारपत्रके वाटप करणाºया महिला काहीही संवाद न साधता पत्रके घरासमोर टाकत पुढे पुढे जात होत्या. पुन्हा दुसºया दिवशी काही अन्य उमेदवारांचीच पत्रके याच कॉलनीत वाटत आली असतानापुन्हा कॉलनीतील महिलांनी समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. तेव्हा पत्रके वाटप करणाºया महिलाम्हणाल्या अहो ताई, कालच तुम्ही सर्व समस्या सांगितल्याना? मग आज पुन्हा कशाला सांगता? त्यावर कॉलनीतील महिलांनी स्पष्ट केले. तुम्ही काल वेगळ्या उमेदवाराचीपत्रके घेऊन आल्या होत्या. आज वेगळ्याच उमेदवाराचीपत्रके वाटप करीत आहात. याच चर्चेत सहभागी होत कॉलनीतील एक आजीबाई बोलल्या तुम्ही,डोक्यावरच्या टोप्या बदलल्या पण आमच्या समस्यातर कायम आहेत ना !

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूक