...तर चांदवड, देवळ्यात भुसे पॅटर्न

By Admin | Updated: July 5, 2014 00:22 IST2014-07-04T22:20:36+5:302014-07-05T00:22:28+5:30

...तर चांदवड, देवळ्यात भुसे पॅटर्न

... then Chandwad, Roasted Roasted Pattern | ...तर चांदवड, देवळ्यात भुसे पॅटर्न

...तर चांदवड, देवळ्यात भुसे पॅटर्न

चांदवड : चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेनेची ताकद जास्त असून चांदवड- देवळा मतदारसंघाची जागा शिवसेनेला न सोडल्यास दाभाडीसारखाच आमदार दादा भुसे पॅटर्न या मतदारसंघात राबविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चांदवड तालुका शिवसेनाप्रमुख नितीन अहेर व देवळा तालुका शिवसेनाप्रमुख देवा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिवसेनेची भूमिका विषद करण्यासाठी चांदवड येथील जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेत पत्रकार परिषद आयोजित घेण्यात आली . यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खैरे, बंडू गांगुर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य कारभारी अहेर, जिल्हा उपतालुकाप्रमुख राजकुमार संकलेचा, नितीन अहेर, देवा वाघ, वडाळीभोईचे प्रमुख प्रदीप अहेर, गणुकाका सोनवणे, चांदवड शहराध्यक्ष जगन्नाथ राऊत, रवींद्र काळे, गुड्डू खैरनार, सागर बर्वे, अ‍ॅड.विशाल व्यवहारे, दीपक शिरसाठ, शंभू खैरे, भिकचंद कोकणे, संदीप ऊगले, समाधान जाधव आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
सन १९९९ पासून विधानसभेला भाजपाचा उमेदवार निवडून आलेला नाही. सन १९९७ पासून शिवसेनेचे प्रत्येक निवडणुकीत किमान दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. आज रोजी तालुक्यात व मतदारसंघात भाजपापेक्षा अधिक ग्रामपंचायत सरपंच व सदस्य निवडून आलेले आहे. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा व बुथप्रमुखाची संघटनात्मक रचना आहे. देवळा पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. सहकार क्षेत्रात अनेक बँका, पतसंस्था, विकास सेवा सोसायटीत शिवसेनेचे पदाधिकारी व संचालक असताना आम्ही या विधानसभेच्या जागेवर हक्क का सांगू नये, असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. आतापावेतो भाजपने शिवसैनिकांना वापरण्याचे काम भाजपाने केले असून,यासाठी इतिहास तपासून बघावा असेही ते म्हणाले. या मतदारसंघातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत पाणीप्रश्नावर निवडणुका लढविल्या मात्र निवडणूक संपलीकी पाणीप्रश्नाचा त्यांना विसर पडतो, असेही पत्रकार परिषदेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
सांगितले. (वार्ताहर)

Web Title: ... then Chandwad, Roasted Roasted Pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.