...तर टळली असती दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:13+5:302021-07-22T04:11:13+5:30
सदर रस्त्याचे नियंत्रण नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आल्या असून अनेक झाडे जीर्ण ...

...तर टळली असती दुर्घटना
सदर रस्त्याचे नियंत्रण नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आल्या असून अनेक झाडे जीर्ण होऊन वाळलेले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी अनेकवेळा झाडे पडली मात्र सुदैवाने हानी झाली नव्हती. मात्र बुधवारी (दि.२१) वाळलेले झाड पडून तीन शिक्षकांना जीव गमवावा लागला. रस्ता सुरक्षितता दृष्टीने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडणे, वाळलेली झाडे तोडणे आदी कामे होणे आवश्यक होते. मात्र ते न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक झाडे तोडावी व रस्ता सुरक्षा उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर रस्ता हायब्रीड एन्यूटी प्रोग्रॅम मधून रद्द करत स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा व या रस्त्यावरील वाहनांची संख्या पाहता रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे अशी मागणी होत आहे.