केवळ मौजमजेसाठी त्यांची मोबाइल चोरगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:00 IST2017-07-18T01:00:08+5:302017-07-18T01:00:45+5:30
केवळ मौजमजेसाठी त्यांची मोबाइल चोरगिरी

केवळ मौजमजेसाठी त्यांची मोबाइल चोरगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दुचाकीवरून भटकंती करत पादचाऱ्यांच्या हातातून केवळ मौजमजेसाठी मोबाइल पळविणे तसेच घरांच्या खिडक्यांमधून मोबाइल चोरी करणाऱ्या तिघा संशयितांच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर गाव, गंगापूररोड, आनंदवल्ली परिसरात मोबाइल चोरी करून तीन ते चार चोरटे मौजमजा करत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी मिळाली. त्यांनी तत्काळ बातमीदाराकडून संशयितांची दुचाकी व त्यांचे वर्णनाची माहिती घेऊन पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करून परिसरात सापळा रचला. त्यानुसार शोध घेत संशयित कल्पेश मनोज गुंजाळ (२१.रा.गोवर्धन), विल्सन उर्फ गौरव अशोक राठोड (१८) आणि एक अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केली असता चाळीस हजार रुपये किमतीचा अॅपल सातपूर कॉलनीतून, तर रामकुंड पंचवटी येथून १६ हजारांचा ओप्पो, दहा हजारांचा रेड मी एम आय, पंचवटीमधून तसेच दहा हजारांचा एलइटी टीव्ही कंपनीचा पाच हजार रुपये किमतीचा इंटेक्स, एक हजाराचा इंटेक्सचा आणि २० हजार रुपयांचा सॅमसंग नोट-४ असे एकूण सात अॅण्ड्रॉइड मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.