येवल्यात जबरी चोरी
By Admin | Updated: April 2, 2017 00:14 IST2017-04-02T00:14:15+5:302017-04-02T00:14:30+5:30
येवला : नांदगाव रोडवरील समद पार्क कॉलनीत शनिवारी (दि. १) दुपारी २ वाजेच्या सुमारास घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी घरमालकाला मारहाण करून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.

येवल्यात जबरी चोरी
येवला : नांदगाव रोडवरील समद पार्क कॉलनीत शनिवारी (दि. १) दुपारी २ वाजेच्या सुमारास घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी घरमालकाला मारहाण करून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
शहरातील नांदगाव रोडवरील समद पार्क कॉलनीतील मो.इस्माईल अब्दुल समद अन्सारी यांच्या राहत्या घरात दुपारी २ वाजेच्या सुमारास मो. इस्माईल व त्यांचे कुटुंब
झोपलेले असताना २५ ते ३० वयोगटातील चड्डी - बनियन घातलेले मध्यम रंगाचे हिंदी भाषिक तीन अज्ञात चोरटे घुसले. तीन चोरट्यांपैकी एक चोरटा घराच्या बाहेर उभा राहिला व दोघांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व मो. इस्माईल यांच्या पाठीवर व डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला केला.
मो. इस्माईल यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून व मुलाला पळवून नेण्याची धमकी देऊन घरातील मुद्देमाल कुठे ठेवलाय याबाबत विचारणा केली व त्यांच्याकडून कपाटाची चावी घेऊन कपाटातील २५ हजार रुपयाची
रोख रक्कम व ८० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने जोरून नेला. त्यामुळे मो. इस्माईल यांच्या फिर्यादीनुसार तीन अज्ञात चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर करत आहेत. (वार्ताहर)