म्हसरूळ, पंचवटीतून दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST2021-05-29T04:12:01+5:302021-05-29T04:12:01+5:30

नाशिक : शहरात दुचाकी वाहनांच्या चोरीचे सत्र सुरूच असून, म्हसरूळ व पंचवटी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुन्हा दोन दुचाकी ...

Theft of two-wheelers from Mhasrul, Panchavati | म्हसरूळ, पंचवटीतून दुचाकींची चोरी

म्हसरूळ, पंचवटीतून दुचाकींची चोरी

नाशिक : शहरात दुचाकी वाहनांच्या चोरीचे सत्र सुरूच असून, म्हसरूळ व पंचवटी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुन्हा दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना म्हसरूळच्या दिंडोरी रोड परिसरातील धर्मनंदन सोसायटीतील पार्कीिगमध्यये घडली. याठिकाणी नितीन आनंदा चौधरी यांनी त्यांची लाल व पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी एमएच १५ ईव्ही ९५२१ हँडल लॉक करून पार्क केली होती. मात्र, अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून दुचाकीची चोरी केली. चौधरी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना गंगाघाटावरील य.म. पटांगणावर घडली. याठिकाणी प्रशांत गजानन काची (४०) यांनी गंगाघाटावरील यशवंत महाराज पटांगण येथे त्यांची दुचाकी उभी केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. प्रशांत काची यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Theft of two-wheelers from Mhasrul, Panchavati