तहसील कचेरीजवळून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:12 IST2021-01-02T04:12:47+5:302021-01-02T04:12:47+5:30

----- शेतीच्या बांधावरून हाणामारी मालेगाव : तालुक्यातील तळवाडे शिवारात गेल्या गुरुवारी शेताच्या सामाईक बांधाच्या कारणावरून हाणामारी झाली असून, या ...

Theft of two-wheeler from tehsil office | तहसील कचेरीजवळून दुचाकीची चोरी

तहसील कचेरीजवळून दुचाकीची चोरी

-----

शेतीच्या बांधावरून हाणामारी

मालेगाव : तालुक्यातील तळवाडे शिवारात गेल्या गुरुवारी शेताच्या सामाईक बांधाच्या कारणावरून हाणामारी झाली असून, या प्रकरणी महेंद्र बापू पवार, किशोर बापू पवार, बिबाबाई बापू पवार सर्व रा. तळवाडे शिवार यांचे विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुष्पराज बाळासाहेब कुंवर (१९) याने फिर्याद दिली. फिर्यादीचा भाऊ कल्पराज हा कांद्यासाठी शेत बांधत असताना, आरोपींनी सामाईक बांधाच्या कारणावरून कुरापत काढून फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादीचे वडील बाळासाहेब कुवर हे आरोपीस समजावून सांगत असताना, त्याचा राग येऊन किशोर पवार याने दगड मारून डोके फोडून दुखापत केली. फिर्यादीची आई विजया हिलाही बिबाबाईने दगड मारुन डोके फोडले. फिर्यादीचे आजोबा कोंडाजी कुंवर यांना आरोपी पकडत असताना विहिरीजवळील कड लागून डोक्यात दुखापत झाली. अधिक तपास पोलीस नाईक पारधी करीत आहेत.

-----

दुकानात चोरीचा प्रयत्न

मालेगाव : कॅम्पातील कृषीनगरमधील माही मेडिकल दुकानात गेल्या गुरुवारी टामी कटावणीचे साहाय्याने दुकानाचे शटर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भिका सदू भोये (४८) रा. लोंढा नाला, आकलाड मोराणे, ता. जि. धुळे याचे विरुद्ध कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण विश्वनाथ सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

----

Web Title: Theft of two-wheeler from tehsil office