चोरी चोरी.... चुपके चुपके!

By Admin | Updated: February 14, 2016 23:27 IST2016-02-14T23:23:57+5:302016-02-14T23:27:37+5:30

व्हॅलेंटाइन्स डे : पोलिसांची नजर चुकवून प्रेमीयुगुलांचे ‘सेलिब्रेशन’

Theft theft ... silently sneak up! | चोरी चोरी.... चुपके चुपके!

चोरी चोरी.... चुपके चुपके!

नाशिक : पोलिसांच्या नजरा चुकवत महत्प्रयासाने आपल्या जिवलगाला भेटून मनातल्या गुजगोष्टींना वाट मोकळी करून देत प्रेमीयुगुलांनी आजचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ संस्मरणीय केला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करूनही शहरालगतच्या प्रेक्षणीय स्थळांवर ‘चोरी चोरी चुपके चुपके’ भेटत, जोडीदाराला भेटवस्तू देत प्रेमवीरांनी हा दिवस ‘सेलिब्रेट’ केला.
सोशल मीडिया कितीही प्रभावी झाला असला, तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद निराळाच. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी आजच्या ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या भेटीचे नियोजन आधीच करून ठेवले होते. यंदाचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ रविवारी आल्याने काहींची चांगलीच गोची झाली. एरवी महाविद्यालयात जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या तरुणाईला आज मात्र सुटीमुळे खास कारणे शोधावी लागली, तर सुटी असल्याने अनेकांना निवांत भेटीची मोकळीक मिळाली. जोडीदारासाठी गुलाबाची फुले, चॉकलेट्स, टेडीसह अन्य भेटवस्तू आधीच खरेदी करून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या नजरा चुकवत ठरलेल्या ठिकाणी भेटून या वस्तूंचे आदानप्रदान करीत प्रेमीयुगुलांनी आजचा दिवस यादगार करून टाकला.
दरम्यान, ‘व्हॅलेंटाइन्स डे’निमित्त शहरातील प्रेक्षणीय ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेगाने धावणाऱ्या दुचाकींवर कारवाई केली जात होती. सोमेश्वर, आसारामबापू पूल, गंगापूररोड, पांडवलेणी, फाळके स्मारक, तपोवन, गंगापूर धरण आदि ठिकाणी प्रेमीयुगुले दिसून येत होती. उद्यानांमध्येही मोक्याच्या जागा तरुणाईने अडवल्या होत्या.
महामार्गालगतची हॉटेल्स, आइस्क्रीम पार्लर्स, कॉफी शॉप्समध्ये तरुण-तरुणींचे घोळके दिसत होते, तर काही प्रेमवीरांनी चित्रपटगृहांमध्ये प्रेमदिन साजरा केला. (प्रतिनिधी)

Web Title: Theft theft ... silently sneak up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.