रायपूर शिवारात पैठणीच्या दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST2021-07-10T04:11:44+5:302021-07-10T04:11:44+5:30

चोरट्यांनी तार कटिंग करण्याच्या कैचीच्या साहाय्याने दुकानाचे कुलूप लावण्याची पट्टी तोडून आत प्रवेश केला व ...

Theft at Paithani's shop in Raipur Shivara | रायपूर शिवारात पैठणीच्या दुकानात चोरी

रायपूर शिवारात पैठणीच्या दुकानात चोरी

चोरट्यांनी तार कटिंग करण्याच्या कैचीच्या साहाय्याने दुकानाचे कुलूप लावण्याची पट्टी तोडून आत प्रवेश केला व दुकानातील गल्ल्यात ठेवलेले १५ हजार ३८० रुपये चोरून नेल्याची फिर्याद अशोक नथु आहेर रा. भडाणे यांनी चांदवड पोलीस ठाण्याला दिली आहे. चोरीची माहिती मिळताच मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकासदेखील पाचारण केले होते. श्वानपथकाने दुकानापासून एक किमी गावाकडे माग दाखविला. याबाबत चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------

फोटो- ०९ रायपूर पैठणी

रायपूर शिवारातील राजलक्ष्मी पैठणी या दुकानाचे शटर तोडून चोरी झाल्यानंतर घटनास्थळी तपास करताना पोलीस.

--------------------------------------------------

090721\09nsk_27_09072021_13.jpg

फोटो- ०९ रायपूर पैठणी  रायपूर शिवारातील राजलक्ष्मी पैठणी या दुकानाचे शटर तोडून चोरी झाल्यानंतर  घटनास्थळी तपास करतांना पोलीस. 

Web Title: Theft at Paithani's shop in Raipur Shivara