नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी

By Admin | Updated: July 21, 2016 23:51 IST2016-07-21T23:35:38+5:302016-07-21T23:51:25+5:30

नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी

Theft in the Nanded-Mumbai Express | नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी

नांदेड-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चोरी


मनमाड : नांदेड-मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दोन प्रवाशांचे लॅपटॉप, मोबाइल असा ५० हजारांचा ऐवज चोरून नेला.
देवगिरी एक्स्प्रेसमधून मंगळवारी मध्यरात्री प्रवास करणारे रजनीश विजयप्रकाश शर्मा, रा. हॅप्पी होम कॉलनी, द्वारका यांचा १७ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीस गेला. दुसरे प्रवासी राजेश राजप्पा स्वामी यांचे दोन टॅब व मोबाइल असा ३० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. दोन्ही प्रवाशांना मनमाड रेल्वेस्थानक सोडल्यानंतर लॅपटॉप, टॅब, मोबाइल चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून तो मनमाड रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
नांदेड डॉ. भालचंद्रनगर येथे राहाणारे डॉ. अनिल शेषराव दिघावकर हे गेल्या शनिवारी नांदेड-मुंबई देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करीत
होते. औरंगाबाद ते नाशिक प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी डॉ. दिघावकर यांच्या ३३ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. रेल्वेमध्ये प्रवाशांचे सामान,
मौल्यवान वस्तू, रोख, मोबाइल चोरीला जाण्याच्या घटनेमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Theft in the Nanded-Mumbai Express