निसाकात लाखोंच्या यंत्रसामग्रीची चोरी
By Admin | Updated: September 7, 2016 01:01 IST2016-09-07T01:00:52+5:302016-09-07T01:01:43+5:30
कार्यकारी संचालकांकडून निफाड पोलिसांत फिर्याद दाखल

निसाकात लाखोंच्या यंत्रसामग्रीची चोरी
निफाड : अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या आणि थकबाकीमुळे जप्ती करावी लागलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या लाखो रुपये किमतीच्या यांत्रिकसामग्रीची चोरी झाल्याचे उघडकीस आले असून, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. बी. भंडारे यांनी निफाड पोलिसात्ां फिर्याद दाखल केली आहे
आधीच कर्जाच्या खाईत बुडल्याने जिल्हा बँकेची जप्ती ओढवलेल्या निफाड कारखान्यात साहित्याचीही चोरी झाल्याने अजून नाचक्की झाली असून, कारखान्याचे सुरक्षा रक्षक काय करत होते, असा सवाल निर्माण झाला आहे.
१३६ कोटी ५८ लाख रूपये कर्ज असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्यावर २९ आॅगस्टला नाशिक जिल्हा बँकेने थकबाकीपोटी जप्ती करून सील लावले त्यापूर्वीच २७ आॅगष्टला कारखान्याचे सहाय्यक अभियंता धनंजय शंखपाळ यांनी हि बाब लक्ष्यात आणून दिल्यानंतर त्यानुसार कार्यकारी संचालक भंडारे यांनी पोलिसांकडे रीतसर फिर्याद निफाड पोलिसात दाखल केली
त्यात म्हंटले आहे कि अज्ञात इसमाने कारखान्याच्या पॉवर हाऊस मधील पॅनोल बोर्ड, तांबे धातूच्या पट्ट्या, रॉड असे साहित्य काढून नेले आहे १९६५ साली खरेदी केलेले हे साहित्य १२४० कि ग्रे रक्कम ८६८०० रु. १९७२ साली खरेदी केलेले ४५० कि ग्रॅ ३६००० रु. असे एकूण १ लाख २२ हजार ८०० रुपयांचे साहित्य जागेवर नाही असे फिर्यादीत म्हंटले आहे
एप्रिल महिन्यात निफाड कारखान्याचा विद्यूत पुरवठा वीजिबल न भरल्याने खंडित केला होता त्या महिनाभराच्या काळात कारखान्याच्या पावर हाऊस मध्ये हि चोरी झाल्याची शक्यता आहे त्या काळात वीज नसल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हि चोरी झाली आहे. (वार्ताहर)