बांधकाम प्रकल्पातून साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST2021-09-22T04:16:54+5:302021-09-22T04:16:54+5:30
नाशिक : कन्नमवार पुलाच्या पश्चिमेस सुरू असलेल्या सर्व्हिस रोडलगत बांधकाम प्रकल्पातून पाच संशयितांनी बांधकाम साहित्याची चोरी केल्याचा प्रकार समोर ...

बांधकाम प्रकल्पातून साहित्याची चोरी
नाशिक : कन्नमवार पुलाच्या पश्चिमेस सुरू असलेल्या सर्व्हिस रोडलगत बांधकाम प्रकल्पातून पाच संशयितांनी बांधकाम साहित्याची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी जेलरोड इच्छामणीनगर परिसरातील रहिवासी अक्षय अनि्ल पवार (३०) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित कार्तिक गणेश जाधव (९१५, रा. शितळादेवी मंदिराजवळ, नानावली), चंदू शामा रहासे ऊर्फ भोला (३०, रा. मांडवी, जि नंदुरबार), नीलेश कांबळे, नवादा व मामा म्हणून परिचित असलेल्या एकाने अशा पाच जणांनी मिळून बांधकाम प्रकल्पाच्या साइटवरून लोखंडी पाइप, सेंट्रिंग कपलॉक यासह लोखंडी गडाचे तुकडे असा सुमारे दहा हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असून, संशयितांविरोधात अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.