हमीद हुसेन इम्तियाज अहमद (३६) रा. नवीवस्ती यांनी फिर्याद दिली. ११ डिसेंबरच्या रात्री साडेअकरा ते १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद यंत्रमाग कारखान्याचा कडीकोयंडा कापून आत प्रवेश केला. यंत्रमाग कारखान्यातील प्रत्येकी ८ हजार २०० रुपयाप्रमाणे ११ कॉईनचे थैले चोरून नेले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. आर. काळे करीत आहेत.मालेगावी कुबा मशिदीजवळून दुचाकी चोरीमालेगाव : शहरातील बतुल पार्क कुबा मशिदीसमोरून ८ डिसेंबर रोजी रात्री ११ ते ९ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ झेड ८०१४ चोरून नेली. शेख एकबाल मोहंमद हुसेन यांनी आयेशानगर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
मालेगावी यंत्रमाग कारखान्यात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:29 IST