वृद्ध दाम्पत्याच्या दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:48 IST2017-09-11T00:48:09+5:302017-09-11T00:48:16+5:30

वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

Theft of jewelery worth half a million jewelers | वृद्ध दाम्पत्याच्या दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

वृद्ध दाम्पत्याच्या दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
सदाशिव त्र्यंबक काळे (६२, रा़ आशीर्वाद अपार्टमेंट, शंकरनगर, टाकळीरोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती राहुल काळे, रंजना सुरेश सोनवणे, सुरेश मुरलीधर सोनवणे, मधू सुरेश सोनवणे, संजय कटारे व संतोष साळवे या सहा संशयितांनी ९ जून ते ९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत त्यांच्या टाकळी रोडवरील फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला़ तसेच घरातील १० हजार रुपये रोख, ८ तोळ्याचे मंगळसूत्र, ५ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या असे १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच काळे दाम्पत्यास जिवे मारण्याची धमकी देत बेघर केले़ यामुळे बेघर झालेल्या सदाशिव काळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती़ यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश भद्रकाली पोलिसांना दिले होते़

Web Title: Theft of jewelery worth half a million jewelers